esakal | Cruise Drugs Case; 'आर्यन घेतोय नियमित ड्रग्ज, एक वर्षाची व्हावी शिक्षा'
sakal

बोलून बातमी शोधा

aryan khan cordelia cruise

Cruise Drugs Case; 'आर्यन घेतोय नियमित ड्रग्ज, एक वर्षाची व्हावी शिक्षा'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आर्यन खान प्रकरणानं आता मोठं वळण घेतलं आहे. आज त्या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. त्या दरम्यान एनसीबीनं केलेल्या एका युक्तिवादामध्ये धक्कादायक माहिती सांगितली आहे. त्यामुळे येत्या काळात आर्यनच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. आर्यननं पहिल्यांदाच ड्रग्जचं सेवन केलेलं नाही. यापूर्वी देखील त्यानं ड्रग्जचं सेवन केलं आहे. तो नियमित ड्रग्ज घेणारा आहे. असा खुलासा एनसीबीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या काही काळासाठी न्यायालयाचे कामकाज तहकुब करण्यात आले आहे.

दुपारी दोनच्या दरम्यान आर्यनच्या प्रकरणावर सुनावणी झाली. मात्र त्यावेळी एनसीबीच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात आला त्यात आर्यनबद्दल वेगळी माहिती सांगण्यात आली आहे. त्यात महाधिवक्ता अनिल सिंग यांनी सांगितलं की, सध्या हाताशी असलेली माहिती आणि पुरावे पाहता आर्यनला किमान एका वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यानं काही पहिल्यांदाच ड्रग्ज घेतलेलं नसून यापूर्वी देखील त्यानं ते घेतलं आहे. तो त्याचे नियमित सेवन करत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी सिंग यांनी अरबाज मर्चंट याच्याविषयीही काही गोष्टी कोर्टासमोर ठेवल्या.

अद्याप या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान हा कोठडीत आहे. त्याला सोडविण्यासाठी शाहरुखनं जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र त्यात त्याला यश आलेलं नाही. बॉलीवूडमधून अनेक सेलिब्रेटींचा त्याला पाठींबा मिळाला आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या मदतीला धावून गेला आहे. अशावेळी शाहरुख काही करुन आर्यनला सोडविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसुन आले आहे. एएसजी यांनी आर्यनला किमान एका वर्षांची शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयाकडे मागणी केली आहे. आता त्यावरही न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

हेही वाचा: Drugs Case: आर्यन खानला ठेवणार सामान्य कैद्यांसोबत

हेही वाचा: 'आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात'

loading image
go to top