Captain America Vs Attack कोण जिंकणार?, जॉन अब्राहमची परीक्षा|Bollywood Attack Jon Abraham | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jon And Captain America

Captain America Vs Attack कोण जिंकणार?, जॉन अब्राहमची परीक्षा

Bollywood News: बॉलीवूडमध्ये अॅक्शनपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे जे मोजके कलाकार आहेत त्यापैकी जॉन अब्राहमचा (Jon Abraham) चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या (Entertainment News) चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. आज त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा अटॅक (Attack Movie) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून चाहते जॉनच्या या चित्रपटाची वाट पाहत होते. त्याच्या ट्रेलरला (Trailer Viral) प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. गेल्या दिवसांत टॉलीवूडचे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यापैकी आरआरआर (RRR Movie) हा एक चित्रपट आहे. दुसरीकडे हॉलीवूडच्या कॅप्टन अमेरिकेशी जॉनची तुलना होताना दिसत आहे. यासगळ्यात कोण जिंकणार असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

अटॅकमध्ये जॉनन एका सुपर सोल्जरशी भूमिका केली आहे. जी आर्टिफिशियल इंटेलिजिन्सशी संबंधित आहे. पहिल्यांदाच जॉन याप्रकारच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यापूर्वी त्याचा मुंबई सागा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता अटॅकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दरम्यान अटॅकमध्ये वापरलेले ग्राफिक्स, अॅक्शन सीन यांची तुलना हॉलीवूडच्या वेगवेगळ्या अॅक्शनपटाशी होताना दिसत आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं कॅप्टन अमेरिका आणि आर्यन मॅनशी होत आहे. चाहत्यांनी जॉनची तुलना ही हॉलीवूड पटांशी केल्यानं चुरस दिसून येणार आहे. काही दिवसांपूर्वी मार्व्हल सीरिजमधील एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा: RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

अटॅकचं बजेट हे 55 कोटींचे आहे. तर मार्व्हलच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचं 1 हजार 62 कोटी रुपयांचे आहे. आर्यन मॅनच्या बजेटचा आकडा पाहिल्यास तो 1 हजार 63 कोटींचा आहे. थोडक्यात जॉनच्या चित्रपटांच्या तुलनेत हॉलीवूडच्या अॅक्शनपटांचे बजेट हे 20 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे निर्मितीमुल्याच्या दृष्टीनं या दोन्ही चित्रपटांची तुलना होणार नाही. दुसरं म्हणजे मार्व्हलच्या सीरिजचा चाहतावर्गही मोठा आहे. तरीही जॉनच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढलेल्या दिसत आहे. यापूर्वी जॉननं त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, त्याचा चित्रपट हा नॅथन कोपलँड नावाच्या एका व्यक्तिवर आधारित आहे. ज्याच्या मेंदुमध्ये एक चीप बसवण्यात आली होती. त्याच्या आधारे त्यानं प्रभावी कामगिरी केली होती.

Web Title: Bollywood Attack Jon Abraham Compare To Marvel Series Avengers Superhero Captain America

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top