Backstreet Boys: अमेरिकन बॉय बँड 'बॅकस्ट्रीट बॉईज' 13 वर्षांनंतर भारतात करणार परफॉर्म, जाणून घ्या कधी, कुठे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

backstreet boys

Backstreet Boys: अमेरिकन बॉय बँड 'बॅकस्ट्रीट बॉईज' 13 वर्षांनंतर भारतात करणार परफॉर्म, जाणून घ्या कधी, कुठे

अमेरिकन बॉय बँड 'बॅकस्ट्रीट बॉईज' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 13 वर्षांनंतर अमेरिकन बॉय बँड 'बॅकस्ट्रीट बॉईज' हा भारतात परफॉर्म करणार आहे. अमेरिकन बॉय बँड 'बॅकस्ट्रीट बॉईज' ने आपल्या 'डीएनए वर्ल्ड टूर'चा भाग म्हणून 13 वर्षांनंतर भारतात परफॉर्म करणार असल्याची घोषणा केली आहे.

अमेरिकन बॉय बँड 'बॅकस्ट्रीट बॉईज' भारतातील दोन शहरांमध्ये परफॉर्म करणार आहे. 'बॅकस्ट्रीट बॉईज' प्रथम 4 मे रोजी मुंबईच्या जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये आणि नंतर 5 मे रोजी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सादर करतील.

अमेरिकन बॉय बँड 13 वर्षांनंतर भारतात परफॉर्म करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 2010 मध्ये या बँडने भारतात शेवटचा दौरा केला होता.

डीएनए र्ल्ड टूर ही उत्कृष्ट कोरियोग्राफी, आय वॉन्ट इट दॅट वे, एव्हरीबडी आणि अॅज लाँग अॅज यू लव्ह मी, 'डोंट गो ब्रेकिंग माय हार्ट', 'चान्स' आणि 'नो प्लेस' सारख्या हिट गाण्यांसाठी आणि आवाजासाठी ओळखले जाते. त्याचा अलीकडचा अल्बम डीएनएही हिट झाला आहे.

टॅग्स :Entertainment news