Shehnaaz Gill: स्टेजवर अजान ऐकताच शहनाज गिलनं केलं हे काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shehnaaz gill

Shehnaaz Gill: स्टेजवर अजान ऐकताच शहनाज गिलनं केलं हे काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

शहनाज गिल ही भारतातील सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'बिग बॉस 13'मध्ये दिसल्यानंतर ग्लॅमरच्या दुनियेत तिची चमक सर्वत्र पाहायला मिळत आहे. फॅशनमध्येही ती मोठ्या अभिनेत्रींना स्पर्धा देत आहे.

शहनाज गिल एका अवॉर्ड शो मध्ये दिसली होती. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्याला पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

खरं तर, काल रात्री 22 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये टीव्हीशी संबंधित अनेक स्टार्स दिसले होते. शहनाज गिल देखील या कार्यक्रमाचा एक भाग होती. तिला 'डिजिटल पर्सनॅलिटी ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना तिने असे काही केले, ज्याने सर्वांची मनं जिंकली.

जेव्हा शहनाजला या पुरस्कारासाठी मंचावर बोलावण्यात आले तेव्हा तिला गाणे म्हणण्यास सांगण्यात आले. अभिनेत्री पंजाबी गाणे गात होती. तितक्यातच अजान सुरू झाली. अजानचा आवाज ऐकून शहनाजने तिचे गाणे थांबवले आणि आदराने उभी राहिली. सर्व धर्मांबद्दलचा आदर पाहून शहनाजचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. शहनाजच्या या व्हिडिओची इंटरनेटवर खूप चर्चा होत आहे.

अवॉर्ड शोमध्ये जेव्हा शहनाजला तिचा लकी नंबर कोणता असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने लगेचच '12:12' असे उत्तर दिले. यामागचे कारण सांगितल्यावर अभिनेत्रीने सांगितले की, हा नंबर तिच्या फोनमध्ये सर्वात जास्त दिसतो, त्यामुळे हा तिचा लकी नंबर आहे. मात्र, प्रत्यक्षात ती दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची जन्मतारीख आहे.

12 डिसेंबर 1980 रोजी सिद्धार्थचा वाढदिवस असतो. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सिद्धार्थ आणि शहनाज रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातंय. अनेकवेळा अभिनेत्रींनी ही गोष्ट मान्यही केली आहे.