गुलशन कुमार हत्याकांड: 'तो म्हणतोय, मला पुन्हा भारतात यायचंय' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुलशन कुमार हत्याकांड: 'तो म्हणतोय, मला पुन्हा भारतात यायचंय'
गुलशन कुमार हत्याकांड: तो म्हणतोय, 'मला पुन्हा भारतात यायचंय'

गुलशन कुमार हत्याकांड: 'तो म्हणतोय, मला पुन्हा भारतात यायचंय'

मुंबई - मनोरंजन विश्वातील मोठी सेलिब्रेटी म्हणून टी सीरिजचे मालक गुलशन कुमार यांच्याकडे पाहिले जात होते. 12 ऑगस्ट 1997 मध्ये मुंबईतील अंधेरी येथे त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे हत्या प्रकरण चर्चेत आले आहे. त्या प्रकरणानं बॉलीवूड हादरुन गेले होते. त्या प्रकरणात प्रसिद्ध संगीतकार नदीम सैफ यांच्यावर गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये त्यांचे नाव समोर आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. यानंतर प्रख्यात संगीतकार नदीम यांनी इंग्लंडला पलायन केले. 2002 मध्ये कोर्टामध्ये त्यांच्याविरोधात सबळ पुरावे सादर न केल्यानं ती केस रद्द करण्यात आल्याचे म्हटले जाते.

भलेही ती केस रद्द करण्य़ात आली असे बोलले जात असले तरी नदीम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे नदीम अजूनही त्याविषयी त्रस्त आहे. त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की, आपल्याला भारतात परतण्याची इच्छा आहे. मात्र भारतात आल्यास पुन्हा अटकेची भीती आहे. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत. आणि मला ते दूर करावेसे वाटतात. त्यासाठी मला भारतात परत यायचे आहे. गुलशन कुमार हे मला माझ्या लहान भावासारखे होते. त्यांचे माझ्य़ावर खूप प्रेम होते. माझ्याविषयी बराचसा अपप्रचार झाल्याचेही नदीम यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: शिल्पा - राज होणार 'विभक्त'?; चर्चेला उधाण

नदीम यांचे म्हणणे आहे की, आपल्याला भारतात परतायचे आहे. जेणेकरुन मला निर्दोष असल्याचे सिद्ध करता येईल. ज्या व्यक्तीन भारतीय श्रोत्यांना अनवट सुरांचा आनंद दिला त्याच्यावर जे नाही ते आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे मलाही मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. यासगळ्या प्रकरणात आपल्याला फसवण्यात आल्याचेही नदीम यांनी सांगितलं आहे. नदीम आणि श्रवण यांनी आतापर्यत 'आशिकी', 'साजन', 'दिल है कि मानता नहीं', 'दीवाना', 'सड़क', 'सैनिक', 'दिलवाले', 'राजा हिंदुस्तानी', यासारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे.

loading image
go to top