उपचारासाठी पैसे नाहीत; मिथूनच्या 'डिस्को डान्सरचा' दिग्दर्शक आर्थिक संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपचारासाठी पैसे नाहीत; मिथूनच्या 'डिस्को डान्सरचा' दिग्दर्शक आर्थिक संकटात
उपचारासाठी पैसे नाहीत; मिथूनच्या 'डिस्को डान्सरचा' दिग्दर्शक आर्थिक संकटात

उपचारासाठी पैसे नाहीत; मिथूनच्या 'डिस्को डान्सरचा' दिग्दर्शक आर्थिक संकटात

मुंबई - प्रख्यात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बी सुभाष हे मिथूनच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी मिथूनच्या डिस्को डान्सर नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्या चित्रपटाला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मिथून हे सुद्धा बॉलीवूडचे स्टार अभिनेते झाले होते. मात्र आता हा दिग्दर्शक एका मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली होती. त्याला मिथूनच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कमेंट देऊन त्यांच्यासाठी मदतीचे आवाहनही केले आहे.

बी सुभाष यांच्या पत्नी या किडनीच्या विकारानं त्रस्त आहेत. आणि त्या एका रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्या उपचारांसाठी बी सुभाष यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे 77 वर्षीय या दिग्दर्शकानं पैशांसाठी चाहत्यांना आवाहनही केले आहे. त्यांना दोन मुली असून त्या सध्या त्यांची काळजी घेत आहे. कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटी आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी कित्येक सेलिब्रेटींनी त्याबद्दल वेगवेगळ्या पोस्ट देखील सोशल मीडियावर शेयर केल्या आहेत. बी सुभाष यांच्या पत्नीचं नाव तिलोत्तमा असे आहे. 67 वर्षीय तिलोत्तमा या गेल्या पाच वर्षांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: कोण आहेत 'पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ?; विक्रम गोखलेंच्या भाषणात उल्लेख

2020 मध्ये त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र अजूनही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली नाही. या उपचारादरम्यान बी सुभाष हे आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून आले आहे. किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी बी सुभाष यांना मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असून त्यासाठी त्यांनी चाहत्यांना मदतीचे आवाहनही केले आहे. किडनीच्या विकाराबरोबरच तिलोत्तमा यांना दम्याचाही आजार असल्याची माहिती सुभाष यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

loading image
go to top