दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी वाढदिवशी प्रेक्षकांना दिली 'ही' खास भेट

संतोष भिंगार्डे
Sunday, 16 August 2020

वर्षाच्या सुरुवातीला 'कुली नंबर. 1' सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

मुंबई  ः प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी आतापर्यंत विनोदी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. आता त्यांनी 'कुली नं. 1' हा चित्रपट बनविला आहे आणि त्यासाठी ते थिएटर्स उघडण्याची वाट पाहात आहेत. आज डेव्हिड धवन यांचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्यांनी  चित्रपटाचे काही 'बिहाइंड द सीन्स' रिलीज केले आहेत आणि ते पाहून प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली दिसते. चित्रपटातील कलाकार सारा अली खान आणि वरुण धवन यांच्या अनेक पेजेसनी हा फोटो शेअर करत दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

...अन् स्वातंत्र्यदिनी पाटोळ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबली; जलजीवन मिशनद्वारे थेट नळजोडणी

त्यातील एका फोटोमध्ये सारा जांभळी लेगिंग आणि गुलाबी कुर्ती घातलेली महाराष्ट्रीयन लुकमध्ये दिसते. त्याशिवाय तिने परिधान केलेली अंगठी, गोलाकार टिकली, पिवळ्या रंगाच्या बांगड्या आणि कानातले पारंपरिक मराठी महिला, त्यांची संस्कृती आणि शैली याची आठवण करून देत आहेत. या फोटोमध्ये सारा कॅमेर्‍याकडे बघून हसत असताना तिने सहकलाकार वरुण धवनचा हात धरला आहे. तर दुसऱ्या फोटोत डेव्हिड धवन एकटे दिसत आहेत.

निसर्ग नंतर मासेमारीला पुन्हा वादळाचा तडाखा; नव्या हंगामाचा मुहुर्त लांबला; अद्याप मासेमारी नौका बंदरातच

या वर्षाच्या सुरुवातीला 'कुली नंबर. 1' सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. या सिनेमाच्या पहिल्या  भागात गोविंदा आणि करिश्मा कपूर ही जोडी दिसली होती. आता वरुण आणि साराची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. आज डेव्हिड धवन यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
----
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood director david dhavan gives surpirse gift to his fans on bday