तालिबानी जनावरं पाहिलीत?, दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची चिडचिड

सध्या तालिबान्यानं अफगाणिस्तानची काय अवस्था केलीय हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
तालिबानी जनावरं पाहिलीत?, दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची चिडचिड

मुंबई - सध्या तालिबान्यानं अफगाणिस्तानची काय अवस्था केलीय हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांच्याविषयी जगभरातील माध्यमं भरभरुन बोलताना दिसत आहे. तालिबान्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या हिंसाचाराचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. अफगाणिस्तानमध्ये जे वातावरण आहे त्यामुळे तेथील नागरिक तो देश सोडण्याच्या विचारात आहे. अफगाणिस्तान आणि तेथल्या परिस्थितीविषयी बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात कंगना राणावत, अनुराग कश्यप, जावेद अख्तर यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी व्टिट करुन सर्वांते लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी त्यांच्या व्टिटमध्ये अफगाणिस्तान आणि तालिबानी यांच्याविषयी परखड मत व्यक्त केले आहे. राम गोपाल वर्मा हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आशयपूर्ण कलानिर्मितीसाठीही त्यांची ओळख आहे. त्यांचे चित्रपट प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असते. अलीकडच्या काळात गेल्या अनेक वर्षांपासून राम गोपाल वर्मा हे बॉलीवूडपासून लांब असल्याचे दिसुन आले आहे. राम गोपाल वर्मा आपलं मत प्रदर्शित करत असताना कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसल्याचेही यापूर्वी दिसून आले आहे. सध्या त्यांच्या त्या व्टिटनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी तालिबान्यांना जनावर असं म्हटलं आहे. ते जनावर का आहेत हे दर्शविण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओही शेयर केला आहे. वास्तविक तालीबान्यांच्या हिंसाचाराचे प्रदर्शन करणारे अनेक व्हिडिओ यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर व्ह्युज मिळाले आहेत. त्यावरुन अफगाणिस्तानमध्ये सध्या कशाप्रकारचे वातावरण आहे याची कल्पना येते. तालिबानी लोकं राष्ट्रपती भवनात घुसले आहे. तिथे ते जेवत आहेत. काही जण जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. तर काही जणांनी लहान मुलांच्या पाळण्यात बसण्याचा आनंदही घेतला आहे. विशेष त्या व्हिडिओमध्ये ते सगळेजण हसत आहेत. आणि लोकांना धमकावत असल्याचेही दिसून आले आहे.

तालिबानी जनावरं पाहिलीत?, दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची चिडचिड
तालिबान्यांचा 'जीममध्ये वर्कआऊट', अदनान सामी भडकला
तालिबानी जनावरं पाहिलीत?, दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची चिडचिड
आम्ही का ठेवलं तैमूर, जहांगीर नाव?, करिनानं सांगितलं कारण

राम वर्मा यांनी आपल्या व्टिटर अकाउंटवरुन ते व्हिडिओ शेयर केले आहे. राष्ट्रपती भवनात नाष्टा करणाऱ्या तालिबान्यांना पाहून राम गोपाल वर्मा यांचा संताप झाला आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही पाहून शकता की, कशाप्रकारे तालिबानी एखाद्या जनावरासारखे वागत आहेत, खात आहेत. हे सगळं किळसवाणं असल्याची प्रतिक्रिया वर्मा यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com