रोहित शेट्टीचा दिलदारपणा; मुंबई पोलिसांसाठी उपलब्ध करून दिली तब्बल 'इतकी' हॉटेल्स....

संतोष भिंगार्डे
Saturday, 11 July 2020

अभिनेता अक्षय कुमार, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी पोलिसांना मदतीचा हात दिला आहे. रोहित शेट्टीने या अगोदर पोलिसांना आराम करण्यासाठी आठ हॉटेल्स उपलब्ध करून दिली होती. आता पुन्हा एकदा रोहित शेट्टी पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात आपल्यासाठी झटत आहेत ते डॉक्टर्स, नर्सेस, अन्य वैद्यकीय कर्मचारी तसेच पोलिस आणि पालिका कामगार. आपल्या जीवाची बाजी लावून ते रात्रंदिवस झटत आहेत. अशा कोरोना योद्धांना प्रोत्साहन देण्यासाठी काही सेलिब्रेटींनी गाणी बनविली आहेत तर काही सेलिब्रेटी आपपल्या परीने मदत करीत आहेत. 

कल्याणमध्ये कोरोना पसरण्याचा धोका; कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.... ​

अभिनेता अक्षय कुमार, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी पोलिसांना मदतीचा हात दिला आहे. रोहित शेट्टीने या अगोदर पोलिसांना आराम करण्यासाठी आठ हॉटेल्स उपलब्ध करून दिली होती. आता पुन्हा एकदा रोहित शेट्टी पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. आता त्याने तब्बव अकरा हॉटेल्स पोलिसांना आराम करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत.

'क्रिश 4'मध्ये हृतीकबरोबर झळकणार 'हा' मोठा कलाकार..?​

दिग्दर्शक रोहित शेट्टी हा नेहमीच अशा प्रसंगी धावून येत असतो. सध्या कोरोनासारख्या महामारीत तो वारंवार मदत करीत आहे. आता त्याने तब्बल अकरा हॉटेल्स पोलिसांसाठी उपलब्ध केली आहेत. याबद्दल पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सोशल मीडियावर रोहितचे आभार मानले आहेत.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आम्ही रोहित शेट्टीचे मनापासून आभार मानतो. आम्हाला सुरुवातीपासून ते मदत करीत आले आहेत. आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आता आम्हाला त्यांनी अकरा हॉटेल्स उपलब्ध करून दिली आहेत. 
---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood director rohit shetty avails 11 hotels in mumbai for police