'क्रिश 4'मध्ये हृतीकबरोबर झळकणार 'हा' मोठा कलाकार..?

संतोष भिंगार्डे
शनिवार, 11 जुलै 2020

आता हे दोन मेगास्टार एकत्र येणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दाटलेली आहे. या दोघांना एकत्र आणण्याच्या नावावर टीममधून एकमत झाले असल्याचे समजते. क्रिश 4 या चित्रपटात हृतीक विरुद्ध एक नव्हे तर अनेक खलनायक असणार आहेत.

मुंबई : रोशन कुटुंबियांचा महत्वाकांक्षी असलेल्या क्रिश मालिकेतील क्रिश 4 या आगामी चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात
झाली आहे. निर्माते व दिग्दर्शक राकेश रोशन प्री—प्रॉडक्शनच्या तयारीत असून पडद्यामागे अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. या सर्वांमध्ये  हृतीकबरोबरच शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एका मोठ्या आनंदाची बातमी आहे. या चित्रपटात हृतीक सोबत शाहरुखही एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 

कोरोनामुळे दंतवैद्यकांपुढे संकटांचा डोंगर; कठोर उपाययोजनांसह खर्चही वाढला....

शिवाय या चित्रपटाच्या ग्राफिक्स आणि व्हिज्युअल्सचे महत्वपूर्ण असलेले काम शाहरुखच्या रेड चिली एन्टरटेन्मेंटला देण्यात आली आहे, हे सर्वश्रुत आहे. मात्र आता शाहरूख या चित्रपटात काम करणार आहे. 'वॉर' या चित्रपटाच्या यशानंतर हृतीक आणि 'झिरो' या चित्रपटानंतर शाहरुख यांच्याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये पुढील चित्रपटामध्ये बघण्याची प्रचंड उत्कंठा लागून राहिली आहे. 

पुनःश्च लॉकडाऊन : १९ जुलैपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये 'या' गोष्टी राहणार सुरु, 'या' राहणार बंद

त्यातच आता हे दोन मेगास्टार एकत्र येणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दाटलेली आहे. या दोघांना एकत्र आणण्याच्या नावावर टीममधून एकमत झाले असल्याचे समजते. क्रिश 4 या चित्रपटात हृतीक विरुद्ध एक नव्हे तर अनेक खलनायक असणार आहेत. त्यात सुपर व्हिलनची जबाबदारी शाहरुख खानवर असल्याचे समजते आहे. याशिवाय 'कोई मिल गया'मधील 'जादू' या चित्रपटात दिसणार आहेच. याच जादूने 2003 मध्ये आलेल्या 'कोई मिल गया'द्वारे मोठी प्रसिद्धी मिळवीत बच्चे कंपनीत मोठी क्रेझ निर्माण केली होती. 

शाब्बास! धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणल्यामुळे WHO कडून कौतुकाची थाप

त्यामुळे हृतीक आणि शाहरुख, रेड चिलीचे व्हिज्युअल इफेक्ट्स, एकापेक्षा अनेक खलनायक आणि जादू यांचा एकत्रित परिपाक कसा असेल, याची उत्कंठा तमाम चाहत्यांना व सिनेमाप्रेमींना असणारच, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywoods star actor will share screen with hrithik Roshan in Krrish 4