'आर्यनच्या जागी उद्या तुमचा मुलगा असेल'; 'कांटे'च्या दिग्दर्शकाचं बॉलिवूडसाठी ट्विट

'त्याच्या संकटाच्या क्षणी मौन बाळगणं शरमेचं आहे'
Aryan Khan
Aryan KhanSakal

मुंबई: क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (drug case) एकाबाजूला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan) अजूनही तुरुंगातून सुटलेला नाहीय. दुसऱ्याबाजूला या प्रकरणात एनसीबीचे (ncb) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. दरम्यान आर्यनच्या पाठिशी बॉलिवूडमधील कलाकार मोठ्या प्रमाणात उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे, तर दुसऱ्याबाजूला अजूनही बॉलिवूड पूर्णपणे शाहरूखशी पाठिशी नाहीय, असं काही कलाकारांचं मत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी शाहरुखच्या समर्थनात एक टि्वट केलं आहे. "शाहरुख खानने चित्रपटसृष्टीतील अनेकांना नोकऱ्या आणि उपजीविकेच्या संधी दिल्या आहेत. चित्रपटसृष्टीच्या प्रत्येक कामासाठी तो नेहमीच उभा राहिला आहे आणि आणि त्याच चित्रपटसृष्टीने त्याच्या संकटाच्या क्षणी मौन बाळगणं शरमेचं आहे" असं संजय गुप्ता यांनी म्हटलं आहे.

Aryan Khan
'माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेव', समीर वानखेडेंच्या वडिलांचा खुलासा

"आज त्याचा मुलगा आहे, उद्या माझा किंवा तुमचा असेल. तेव्हा पण अशाच पद्धतीने गप्प राहाल का?" असा सवाल प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी विचारला आहे. आतिष, कांटे, शूट आऊट लोखंडवाला, शूटआऊट वडाला, जजबा आणि जिंदा या चित्रपटांची निर्मिती दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com