Drishyam 2 : 'दृश्यम 2' ची बॉक्स ऑफिसवर जमवला एवढा गल्ला; प्रेक्षक म्हणताहेत विजय साळगावकर...

Drishyam 2
Drishyam 2Esakal
Updated on

यंदाचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'दृश्यम 2' हा 18 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज झाला. अभिषेक पाठक दिग्दर्शित आणि अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'दृश्यम 2' हा चित्रपट रिलीज होण्याआधीच प्रचंड चर्चेत होता अन् रिलीज झाल्याननतंर या चित्रपटाने बंपर ओपनिंग घेतली.

Drishyam 2
drishyam 2 review : ‘फॅमिली मॅन’चा जोरदार दणका!

या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांचाही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या कलेक्शनवरूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचं दिसतय.मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.38 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे दुस-या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे, दुसऱ्या दिवशी (शनिवारी) चित्रपटाने त्यापेक्षाही चांगली कमाई केली आहे. सुरुवातीच्या वृत्तानुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी भारतात 20 कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 35.38 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या दृष्टिकोनातून दोन दिवसांत चित्रपटाने बजेटच्या निम्म्याहून अधिक कमाई केली आहे. रविवारीही या चित्रपटाला असाच जोरदार प्रतिसाद मिळत राहिला तर तीन दिवसांत तो त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई करु शकेल.

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

Drishyam 2
Drishyam 2: साऊथ व्हर्जनपेक्षा पूर्ण वेगळा आहे हिंदी 'दृश्यम 2', अजय देवगणचा बदलांविषयी मोठा खुलासा

2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम' चित्रपटाचा सिक्वेल म्हणून आलेल्या 'दृश्यम 2' चांगलाच गाजत आहे. हा चित्रपट मूळ मल्याळम भाषेत एकाच नावाने बनवलेल्या चित्रपटांचा रिमेक आहेत. मल्याळम भाषेतील 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' लाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचवेळी हिंदीत आलेल्या अजय देवगणच्या 'दृश्यम' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

आता 'दृश्यम 2' हिंदीत आला आहे, तो हिंदीत रिलीज झालेल्या 'दृश्यम'पेक्षा अधिक अप्रतिम काम करताना दिसत आहे. हा सस्पेन्स-क्राइम ड्रामा चित्रपट असून 'दृश्यम 2' मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकर या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन आणि इशिता दत्ता यांच्याशिवाय अक्षय खन्ना देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com