स्वतःच्या निधनावर अनुराग कश्यप म्हणाले, 'यमराजांनी स्वतः घरी परत आणून सोडलं'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 15 September 2020

ट्विटरवर अनुराग कश्यप यांच्या निधनाची अफवा वा-यासारखी पसरली आणि युजर्सना खरं वाटल्याने त्यांनी श्रद्धांजली द्यायला सुरुवात केली.

मुंबई- २०२० या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला. याच दरम्यान अनेक सेलिब्रिटींच्या निधनाच्या अफवा देखील सोशल मिडियावर पसरु लागल्या. अशीच एक अफवा पसरली ती दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याविषयी. ट्विटरवर अनुराग कश्यप यांच्या निधनाची अफवा वा-यासारखी पसरली आणि युजर्सना खरं वाटल्याने त्यांनी श्रद्धांजली द्यायला सुरुवात केली. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः अनुराग कश्यप यांना ट्विट करावं लागलं. 

हे ही वाचा: ड्रग टेस्टपासून वाचण्यासाठी अभिनेत्री रागिणी द्विवेदीने स्वतःच्या युरीनमध्ये मिसळलं पाणी

केआरके बॉक्स ऑफीस नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन लिहिलं गेलं होतं, अनुराग कश्यपच्या आत्म्याला शांती मिळो. तो एक उत्तम कलाकार होता. आम्ही तुम्हाला नेहमी मिस करु. या अकाऊंट बद्दल सांगायचं झालं तर या अकाऊंटवरुन कमाल आर खान अनेक सिनेमांचे रिव्ह्यु आणि बातम्यांवर स्वतःची मतं मांडत असतो. जेव्हा अनेकांनी याबाबतीत ट्विट करायला सुरुवात केली आणि अनुराग पर्यंत ही गोष्ट पोहोचली तेव्हा स्वतः अनुराग यांनी ट्विट करत म्हटलं की स्वतः यमराज मला परत सोडून गेले. 

अनुराग यांनी लिहिलंय, 'काल यमराजांचं दर्शन झालं. आज यमराज स्वतः येऊन घरी परत सोडून गेले. म्हणाले, अजुन तुला खूप सिनेमे बनवायचे आहेत. तु सिनेमे बनवणार नाहीस आणि मुर्ख/ भक्त ते बायकॉट करु शकणार नाहीत आणि त्यांचं आयुष्य सार्थकी लागणार नाही. त्यांनी सार्थकता मिळावी यासाठी मला परत सोडून गेले.' त्यानंतर ट्विटरवर स्पष्टीकरण देत केआरेकेने म्हटलं की 'त्यांच्या कर्मचा-याकडून चूकीची बातमी दिली गेली. ते अनुराग कश्यप नाही तर अनुराग कपूर होते.' 

ट्विटरवर अनेकदा अनुराग कश्यप आणि केआरके एकमेकांशी वाद घालताना दिसले आहेत.   

bollywood film director anurag kashyap death rumors on twitter  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood film director anurag kashyap death rumors on twitter