esakal | आई-वडिलांचा घटस्फोट, करिनासोबतचं ब्रेकअप आणि बरंच काही

बोलून बातमी शोधा

shahid kapoor }

हिंदी चित्रपट सृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजे  शाहिद कपूर. तो आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.

आई-वडिलांचा घटस्फोट, करिनासोबतचं ब्रेकअप आणि बरंच काही
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजे  शाहिद कपूर. तो आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर बॉलिवूड सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

शाहिदचा जन्म हा अभिनयाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातच झाला. त्यामुळे अभिनयाचं बाळकडू त्याला मिळालं असं म्हटलं तरी चालेल. 25 फेब्रुवारी 1981 ला दिल्लीत शाहिद कपूरचा जन्म झाला. त्याचे वडील प्रसिद्ध अभिनेते पंकज कपूर आणि आई नलिमा नझीम यांचा घटस्फोट झाला. शाहिद आपल्या आई आणि आज्जी, आजोबांसोबत दिल्लीमध्ये राहिला. घटस्फोटानंतर पंकज कपूर यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक सोबत दुसरे लग्न केले. शाहिदची आई नलिमाने अभिनेता राजेश खत्तर यांच्याशी दुसरे लग्न केले. त्या दोघांना ईशान नावाचा मुलगा झाला. ईशान आणि शाहिदचे बालपण खूप मजेत गेले. 

हे वाचा - दिव्या भारती- साजिद नाडियादवालाच्या लग्नाची गोष्ट; नेमकं तेव्हा काय घडलं होतं?

शाहिदला लहानपणी पासूनच डान्सची आवड होती. प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक शामक दावरच्या डान्स इन्स्टिट्युटमध्ये त्याने नृत्याचे प्रशिक्षण घेतले. डान्स शिकताना शाहिदने 'ताल' आणि 'दिल तो पागल है' या सुपर हिट चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सरचे काम केले. सुरवातीच्या काळात किट कॅट, पेप्सी, क्लोज-अपच्या जाहिरातींमधून शाहिदने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तसंच त्यानं दिग्दर्शनाचं कामही केलं. 1998 साली 'मोहन दास बी ए एल एल बी' या मालिकेमध्ये सहाय्यक दिग्दर्शक होता. नसिरुद्दिन शहा, सत्यजित दुबे अशा दिग्गज कालकारांच्या अभिनय कार्यशाळांमधून शाहिदने अभिनयाचे धडे घेतले.

2003 साली इश्क विश्क या चित्रपटामधून शाहिद पहिल्यांदाच हिरो म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटात तो अभिनेत्री आमृता राव सोबत रोमॅंटीक अंदाजामध्ये दिसला. त्यावेळी सगळ्यांना शाहिद 'हिरो मटेरियल' वाटला. शाहिदने त्यानंतर अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले. विवाह, जब वी मेट, आर राजकुमार, कमिने, शानदार, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, कबीर सिंग अशा हिट चित्रपटांमधील शाहिदच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. 

यशाच्या शिखरावर असतानाच शाहिदचे नाव अभिनेत्री करीना कपूर सोबत जोडण्यात आले. पण करीनाने अभिनेता सैफ आली खान सोबत लग्न केले. गुरगावला 2017 मध्ये मिरा राजपूत सोबत शाहिदने लग्न केले. 2016 मध्ये शाहिद आणि मिराने गोंडस मुलीला जन्म दिला तिचे नाव मिषा ठेवण्यात आले . सप्टेंबर 2018 मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचं  नाव झेन आहे.

हेही वाचा : आता ही असेल बबड्याची शुभ्रा; तेजश्री प्रधानच्या जागी आली नवी अभिनेत्री

नुकतंच शाहिदचा भाऊ ईशानने त्याच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शाहिद, ईशानच्या बालपणीचा आणि सध्याच्या फोटोचा कोलाज आहे. ' जिंदगी कैसी है पहेली, हाये कभी तो हसाये कभी ये रूलाये... हे सगळे असं असूनही मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहिल,वाढदिवसाच्या शुभेच्छा बडे भाई' असे कॅप्शन ईशानने या फोटोला दिले आहे. प्रसिध्द टिव्ही शो 'कॉफी विथ करणं' मधील या फोटोमध्ये ईशान आणि शाहिद खूप आनंदी दिसत आहेत.