रितेश-जेनेलियाचं 'बॉलिवूड स्टाइल' होळी सेलिब्रेशन; पाहा व्हिडीओ

Riteish Deshmukh and Genelia DSouza
Riteish Deshmukh and Genelia DSouza

बॉलिवूडमध्ये क्युट कपल म्हणून प्रसिध्द असलेली जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया. जेनेलिया सोशल मिडीयावर रितेश आणि मुलांसोबतचे धमाल मस्तीचे व्हिडीयो  शेअर करत असते. हे व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस पडतात. अनेक नेटकरी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. नुकताच जेनेलियाने रितेशसोबचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओला जेनेलियाने कॅप्शन दिले, 'कोणताही उत्सव विशेष बनविण्यासाठी आपला स्वतःचा मार्ग शोधा (सर्व कोविड नियमांचं पालन करून). सर्वांना होळीच्या शुभेच्छा'. या व्हिडीओमध्ये जेनेलिया आणि रितेशचा रोमॅंटिक अंदाज पहायला मिळतोय. 

जेनेलियाने 'सजदे की ये है लाखो..' या प्रसिध्द गाण्यावर हा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओला रितेश आणि जेनिलियाच्या चाहत्यांनी कमेंट करून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी स्केटिंग खेळताना जेनिलिया पडली होती. तेव्हा तिचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे ती एकाच हाताने रंग खेळताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

हेही वाचा : सुझान करतेय अली गोनीच्या भावाला डेट? कमेंटमुळे चर्चांना उधाण

'तुझे मेरी कसम' या हिंदी चित्रपटाच्या सेटवर जेनिलिया आणि रितेशची पहिल्यांदा ओळख झाली. जेनिलिया आणि रितेश अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2012 साली लग्न केले. जेनिलिया आणि रितेशला राहिल आणि रियान ही दोन मुलं आहेत. धमाल , हाऊस फूल, बाही 3, एक व्हिलन या हिट चित्रपटांमधून रितेश प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच माऊली आणि लय भारी या मराठी चित्रपटांमधूनही रितेशने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com