Janhvi Kapoor: आई श्रीदेवीशी तुलना केल्यावर जान्हवी स्पष्टच म्हणाली,.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Janhvi Kapoor

Janhvi Kapoor: आई श्रीदेवीशी तुलना केल्यावर जान्हवी स्पष्टच म्हणाली,..

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टाईल आणि अभिनयाने तिच्या चाहत्यांना वेडं केलं आहे. थोड्याच वेळात ती चाहत्यांची लाडकी बनली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे.( Janhvi Kapoor spoke about being compared to Sridevi)

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

जान्हवीच्या कामाची आणि तिच्या लुकची तुलना नेहमीच तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिच्यांशी केली जाते. काही वेळा तिला यावरुन ट्रोलही करण्यात येते. जान्हवी ट्रोलर्सला दुर्लक्ष करत मेहनत करत राहते. आईशी तुलना केल्याबद्दल जान्हवी एका मुलाखतीत स्पष्टच बोलली आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जान्हवी तिच्या करिअरबद्दल सांगितलं. याचवेळी ती आई श्रीदेवीशी तुलना केल्याबद्दल बरचं काही सांगितलं. ती म्हणाली, ' आईसोबत झालेल्या तुलनेचं मला अजिबात वाईट वाटत नाही. उलट ही तुलना कधीच थांबू नये अशी माझी इच्छा आहे. कारण माझी तुलना माझ्या आईशी होत असेल तर चाहतेही मला सर्वोत्तम मानतात. मी फक्त त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहे.

हेही वाचा: janhvi kapoor: 'रोहितच्या जागी जान्हवीला खेळायला पाठवा', ती मैदानात उतरली अन् नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट

पुढे ती म्हणाली की ती कदाचित तिच्या आईसारखी टैलेंटेड किंवा सुंदर नसेल पण ती तिच्या मेहनतीला तिची ताकद मानते. जान्हवी कपूर याआधीही म्हणाली आहे की, स्टार किड असताना जरी तुम्हाला संधी मिळते मात्र तूम्हाला मेहनतही तितकीच करावी लागते.

हेही वाचा: Janhvi Kapoor Home: जान्हवीला बाथरुमचा दरवाजा बंद करु द्यायची नाही आई,चेन्नईचं 'ते' घर दाखवत म्हणाली..

जान्हवी कपूरने 'धडक' (2018) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती 'गुंजन सक्सेना', 'घोस्ट डायरी', 'रुही', 'गुड लक जेरी' आणि 'मिली' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. आता तिच्या कामात पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा झाली आहे. आता तिने 'मिस्टर अँड मिसेस माही' या स्पोर्ट्स सिनेमा आणि अभिनेता वरुण धवनसोबत 'बावल'मध्येही दिसणार आहे.