Kangana Ranaut: "सौ चुहे खा के.." आयटम सॉंगवर टीका करणाऱ्या कंगणाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

Kangana Ranaut: "सौ चुहे खा के.." आयटम सॉंगवर टीका करणाऱ्या कंगणाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

कंगना रणौत ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. रोजच ती काही ना काही करते अन् चर्चेत येते. मग ते बॉलिवुडच्या कलाकारांवर असो किंवा राजकारणावर. इंडस्ट्रीत राहूनच ती बॉलिवूडमधील कलाकारांवर टिका करत असते. पण यावेळी ती चर्चेत येण्याच कारण  बॉलीवूडचा कोणताही निर्माता किंवा स्टार नसून चित्रपट अधिक लोकप्रिय करण्यासाठी दाखवले जाणारे आयटम साँग आहे.

हेही वाचा: Kangana Ranaut: 'कंगनाचे पक्षात स्वागत, पण...'; लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्याबाबत नड्डा स्पष्टच बोलले

आयटम साँगमध्ये ‘ओ अंटवा’ असो किंवा सनी लिओनीचं ‘बेबी डॉल’.बॉलिवुड ते टॉलिवुड पर्यन्त याची क्रेझ आहे. याचं आयटम साँगवर कंगनाने भाष्य केलं आहे.कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर बॉलीवूड आयटम नंबर्सबद्दल एक लांबलचक स्टोरींच पोस्ट केली आहे. त्यांत तिने 'अश्लील आणि निकृष्ट आयटम नंबर' म्हटले.

कंगनाने दिवंगत अभिनेत्री मधुबालाच्या 'ए मेहेरबान' या लोकप्रिय गाण्याचा एक व्हिडिओ तिच्या स्टोरीला शेअर केला आहे आणि म्हटले आहे की या मोहाचा 'अश्लीलता आणि क्षुल्लक आयटम नंबर'शी काहीही संबंध नाही. ही क्लिप शेअर करताना कंगनाने लिहिले की, "कामुकता आणि प्रलोभन यांचा अश्लीलता आणि क्षुल्लक आयटम नंबरशी काहीही संबंध नाही... या गाण्यात सर्व काही आहे, तरीही स्त्री आणि तिच्या शरीराच्या अवयवांवर कोणतेही आक्षेप नाही.

हेही वाचा: Kangana Ranaut: 'आमिर बॉयकॉट ट्रेंडमुळे नाहीतर, त्याच्या...'

गेल्या वर्षीच , कंगनाने तिला ‘नाचने गाने वाली (आयटम गर्ल)’ म्हणून संबोधल्याबद्दल एका राजकारण्याची कडाडून निंदा केली होती तिने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'जो कोणी हा मूर्ख आहे त्याला माहित आहे की मी दीपिका, कतरिना किंवा आलिया नाही…. मी एकटिच आहे. जिने आयटम नंबर करण्यास नकार दिला आहे.'

तर कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती देशातील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडींवर बनलेल्या 'इमर्जन्सी' चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे.