'पृथ्वीराज' राजपुतांचे की गुर्जरांचे? अक्षयच्या चित्रपटाचा वाद पेटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय कुमार
'पृथ्वीराज' राजपुतांचे की गुर्जरांचे? अक्षयच्या चित्रपटाचा वाद पेटला

'पृथ्वीराज' राजपुतांचे की गुर्जरांचे? अक्षयच्या चित्रपटाचा वाद पेटला

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (bollywood khiladhi actor akshay kumar) हा त्याच्या प्रयोगशील अभिनय आणि चित्रपटासाठी ओळखला जातो. गेल्या वर्षात त्याच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना वादाचा सामना करावा लागला होता. त्यात लक्ष्मी बॉम्ब (laxmi bomb) या चित्रपटाचा समावेश होता. या चित्रपटाचं नाव त्याला बदलावे लागले होते. आगामी काळात त्याचा पृथ्वीराज (prithviraj movie) नावाचा चित्रपट येतो आहे त्यावरुन त्याला ट्रोल केले जात आहे. या चित्रपटामधून काही समुहाच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगितलं जात आहे. त्याचा फटका अक्षयला (akshay kumar) बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे.

राजस्थातील (rajsthan) वेगवेगळ्या भागातून अक्षयच्या पृथ्वीराजला विरोध होत असल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटावरुन गुर्जर आणि राजपुत समुहातील व्यक्ती आमने सामने आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राजस्थानील अजमेर याठिकाणी पृथ्वीराज वरुन वादाला सुरुवात झाली आहे. अजमेरमध्ये आंदोलनंही सुरु झाली आहेत. चित्रपटामध्ये पृथ्वीराज यांना राजपूत समाजाचे असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर गुर्जर (gurjar community) समाजाचे म्हणणे आहे की ते आपल्या समाजाचे होते. यावरुन आता वाद टोकाला गेला आहे. आणि आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात अक्षयच्या या चित्रपटावरुन वादाला सामोरं जावं लागणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या राजस्थानातील अजमेरमधील वैशालीतील भगवान देवनारायण मंदिरासमोर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राजपुत समाजानं असं सांगितलं आहे की, ते आमच्या समाजाचे होते. त्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीनं आणखी काही पुरावे द्यायची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे की, पृथ्वीराज हे राजपुत होते. याविषयी अधिक माहिती देताना राजपुत नेता भंवर सिंह म्हणाले की, जे वास्तव आहे त्याला आपण बदलु शकत नाही. इतिहासामध्ये देखील पृथ्वीराज यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात आली आहे. यासगळ्या प्रकरणावर गुर्जर समाजानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. त्यामध्ये पृथ्वीराज या चित्रपटावर बंदी घालावी असं म्हटलं आहे.

हेही वाचा: बॉलीवूड नावं मोठं, लक्षण खोटं: अभिनेत्री मृणालचा धक्कादायक खुलासा

इंडिया टूडेनं दिलेल्या बातमीनुसार, गुर्जर समाजानं पृथ्वीराजच्या बंदीची मागणी केली आहे. जर हा चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर पहिल्यांदा आम्ही तो पाहणार मगच प्रदर्शित करा. अशी भूमिका गुर्जर समाजानं घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात पृथ्वीराज वरुन नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 21 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: कंगना सुधारली;करिनाच्या पोस्टवर केलेली कमेंट नेटक-यांना भावली...

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top