सुशांत सिंह राजपूतच्या फेसबुक पेजवरून बहिण श्वेताची पोस्ट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actor sushant singh rajput suicide case
सुशांत सिंह राजपूतच्या फेसबुक पेजवरून बहिण श्वेताची पोस्ट...

सुशांत सिंह राजपूतच्या फेसबुक पेजवरून बहिण श्वेताची पोस्ट...

बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला (bollywood actor sushant singh rajput) त्याचे फॅन्स विसरलेले नाहीत. त्याच्या संबंधीच्या वेगवेगळ्या आठवणींना ते सोशल मीडियाच्या (social media post) माध्यमातून उजाळा देत असल्याचे दिसून आले आहे. आपल्या अभिनयानं सुशांत सिंग राजपूतनं अल्पावधीतच मोठं यश संपादन केलं होतं. त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काही बसला होता. त्याचे कित्येक चाहते अद्यापही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. यासगळ्यात सुशांतची बहिण श्वेता ही (sister shweta singh kirti) सोशल मीडियावर आपल्या भावाच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देत असल्याचे दिसुन आले आहे. आता तिनं सुशांत सिंगच्या फेसबूक पोस्टवरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये ती कमालीची भावूक झाली आहे.

एक जानेवारीला दुपारच्या दरम्यान श्वेतानं सुशांतच्या फेसबूक (facebook post share) पेजवरुन पोस्ट शेयर केली आहे. श्वेता सिंह किर्तीनं केलेल्या त्या पोस्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ती पोस्ट श्वेतानं लिहिली आहे. श्वेतानं सुशांतला न्याय मिळावा म्हणून सातत्यानं पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. श्वेतानं जी पोस्ट केली आहे त्यामध्ये तिनं चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं लिहिलं आहे की, तुम्हा सगळ्यांना नव्या वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यावर एका फॅन्सनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं लिहिलं आहे की, सुश अजूनही आमच्या मनात जिवंत आहे. त्याच्या आठवणी कायमच आमच्यासोबत आहे. आम्ही त्याला कधीही विसरु शकत नाही. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, काही काळ मला वाटलं की, सुशांत परत आला आहे.

हेही वाचा: Sushant Singh Rajput Death: पटना उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश

दिग्गज हे कधीही आपल्यातून जात नसतात. त्यांचं काम, त्यांच्या आठवणी या कायम सोबत असतात. आपण त्यांचा विसर पडू द्यायचा नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया एका युझर्सनं केली आहे. जवळपास दीड वर्षानंतर सुशांतच्या फेसबूक पेजवरुन श्वेतानं ही पोस्ट केली आहे. 14 जून 2020 मध्ये सुशांतनं त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनं बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. त्यावेळी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी समोर आल्या होत्या.

हेही वाचा: यंदाच्या वर्षी या बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रेटींच्या घरात हलला पाळणा...

Web Title: Bollywood Late Actor Sushant Singh Rajput Sister Shweta Singh Kirti Share Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top