
Mohammad Rafi: मक्केत मोहम्मद रफी यांनी अजान दिली तेव्हा...
Entertainment News: हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या आवाजानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे गायक म्हणून मोहम्मद रफी (Mohammad Raffi) यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या गायकीवर प्रेम असणारे श्रोते आजही त्यांच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. अद्यापही रफी (Bollywood News) यांच्या गाण्यांची मोहिनी श्रोत्यांच्या मनावर आहे. त्यांची गाणी अवीट सुरांची आहेत. प्ले बॅक गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रफींनी अनेक (Bollywood Movies) भाषांमधून तब्बत सात हजारांहून अधिक गाणी गायली. त्यांच्या नावावर विविध रेकॉर्ड्स आहेत. आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीनं (entertainment news) केवळ भारतात नाहीतर जगभरात त्यांच्या गायकीचे चाहते आहेत. त्यांनी सुगम संगीताबरोबरच भजन, कवाली, प्रेमगीतं, देशभक्तीपर गीतांचे गायन केले.
सध्या राज्यात भोंगा प्रकरण गाजत आहे. त्यानिमित्तानं राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भोंगा उतवरण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. यासगळ्यात पुन्हा राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरण ढवळून निघाले आहे. या परिस्थितीत प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा एक किस्सा पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्यासंबधी एका पुस्तकामध्ये उल्लेख आहे. त्यात ते एकदा मक्केला गेले होते. तिथला माहोल पाहिल्यावर त्यांना अजान द्यावीशी वाटली. मात्र तेथील परंपरेनुसार कुणी बाहरेचा व्यक्ती अजान देऊ शकत नव्हता. रफी यांनी जेव्हा तेथील प्रमुखांना विनंती केली तेव्हा त्या लोकांना कळलं की ते भारतातील मोठे प्रसिद्ध गायक आहेत. आणि त्यांना अजान देण्याची संधी मिळाली होती. त्यांनी अजान दिली तेव्हा तेथील अनेकजण ती ऐकुन मंत्रमुग्ध झाले होते. काही काळ एका वेगळ्याच तंद्रीत असल्याचा अनुभव त्यांनी घेतला. ते रडत होते. असे त्या पुस्तकामध्ये म्हटले आहे.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
24 डिसेंबर 1924 रोजी अमृतसर च्या जवळ असणाऱ्या कोटला सुल्तान सिंह या गावी झाला होता. ते लहान असतानाच त्यांचे कुटूंब हे लाहोर वरुन अमृतसरला आले होते. त्यांच्या कुटूंबामध्ये कोणी संगीताचं शिक्षण घेतलेले नव्हते. मात्र मोहम्मद रफी यांची गोष्ट वेगळी होती. ते या सगळ्याला अपवाद होते. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांना स्टेजवर गायनाची संधी मिळाली होती.
हेही वाचा: Viral Video:आलिशान कारमधे फिरणारी नोरा नटून थटून स्कूटरवर का गेली?
Web Title: Bollywood Legendary Singer Mohammad Raffi Azan In Makka Madina Pilgrims Emotional
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..