bollywood celebrities
bollywood celebrities Team esakal

बॉलीवूड सेलिब्रेटींनो रोनाल्डोकडून काहीतरी शिका

रोनाल्डोच्या निमित्तानं भारतातही कोणते सेलिब्रेटी कुठल्या ब्रँडची जाहिरात करतात हे आपण पाहणार आहोत.

मुंबई - जगप्रसिध्द फुटबॉलपटू रोनाल्डोनं ronaldo पत्रकार परिषदेमध्ये जे काही केलं त्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यानं प्रसिध्द अशा कोक कंपनीची जाहिरात advertisement of coca cola करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्यावर एकीकडे कौतूकाचा वर्षाव होत असला तरी अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. त्याच्या कृतीला विरोध दर्शविण्यासाठी काही खेळाडू पाण्याऐवजी बियरची बाटली पुढे करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. bollywood list of superstars who promote panmasala to cold drinks

रोनाल्डोच्या निमित्तानं भारतातही कोणते सेलिब्रेटी कुठल्या ब्रँडची जाहिरात करतात हे आपण पाहणार आहोत. काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर sachin tendulkar and rahul dravid आणि राहूल द्रविड यांनी आपण सिगारेटची जाहिरात करणार नसल्याचे सांगितले होते. बॉलीवूडमध्येही असे काही सेलिब्रेटी आहेत त्यांनी आपण सिगारेट तसेच शीतपेयांच्या जाहिराती करणार नसल्याचे सांगितले होते. या सगळ्या प्रकरणाची चर्चा रोनाल्डोच्या त्या कृतीमुळे सुरु झाली आहे. त्याचा फॉलोअर्सही मोठा आहे. त्याला इंस्टाग्रामवर 300 मिलियन फॉलोअर्स आहे.

जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणा-यांच्या यादीत तो दुस-या क्रमांकावर आहे. अशावेळी त्यानं एखाद्या ब्रँडच्या बाबत घेतलेली भूमिका महत्वाची ठरते. बॉलीवूडमध्येही कित्येक सेलिब्रेटी वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या जाहिराती करताना दिसतात. त्यामध्ये सलमान खान salman khan (पेप्सी), शाहरुख खान shahrukh khan (विमल इलायची), अजय देवगण ajay devgn (विमल इलायची), ऋतिक रोशन (माउंटन ड्यु), रणबीर कपूर (कोका कोला), टायगर श्रॉफ (पेप्सी), अक्षय कुमार (थम्स अप), ऐश्वर्या राय (कोका कोला), दिशा पटानी (पेप्सी),

bollywood celebrities
सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अंतरिम जामीन मंजूर

रणवीर सिंग (थम्स अप), आमिर खान (कोका कोला), दीपिका पादूकोण (कोका कोला), आलिया भट्ट (कोका कोला), विराट कोहली (पेप्सी), दिलजीत दोसांज (कोका कोला) यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं काही वर्षांपासून पेप्सीची जाहिरात रिन्यु केलेलं नाही. त्याचे म्हणणे आहे, ज्या गोष्टी मी स्वत; खात पीत नाही त्या दुस-यांना खा पी असे कशाला सांगू, या शीतपेयांच्या जाहिराती किमान 5 ते 8 कोटी रुपयांमध्ये तयार होतात. वास्तविक कोल्ड ड्रिंक आपल्यासाठी धोकादायक आहे हे सर्वांना माहिती आहे. असे असतानाही अनेक सेलिब्रेटी त्याची जाहिरात करताना दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com