
'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात 'गोदावरी' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. जियो स्टुडिओजने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
या चित्रपटातील ‘खळ खळ गोदा’ ह्या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.त्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरलाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.या चित्रपटातील जितेंद्र जोशी याची निशी ही भूमिका त्याने त्याच्या लाडक्या मित्राला म्हणजेच निशिकांत कामतला समर्पित केली आहे. मध्यंतरी सोशल मीडिया पोस्टच्या मध्यमातून त्याने याबद्दल सांगितलं देखील होतं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गोदावरी' सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले," नद्या जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. आम्ही आता नद्या स्वच्छ करण्याची मोहीम राबवली आहे.गोदावरी' सारखा सिनेमा केल्याबद्दल जितेंद्र जोशीचे अभिनंदन. 'गोदावरी'शी नातं सांगणारा हा एक सुंदर सिनेमा आहे.11 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत".
या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, गौरी नलावडे, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका सामान्य कुटुंबाची गोष्ट उलगाडतान दिसत आहे. रोजच्या जगण्यातील संघर्ष आणि कौटुंबिक नाट्य एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडायचा प्रयत्न दिग्दर्शक निखिल महाजन यांनी केला आहे. नात्यांतील अबोला, गैरसमज, मनातील भावनांची घुसमट यांची मांडणी चित्रपटात केली आहे. गोदावरी नदीचे सुंदर वर्णन या चित्रपटात दिसतंय.11 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकल्यानंतर 'गोदावरी' सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'गोदावरी'या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 'इफ्फी 2021' मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांनी पटकावला आहे.'वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मध्ये वर्ल्ड प्रीमिअर आणि 'न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये 'एशिया पॅसिफिक प्रीमिअर'ही दाखवण्यात आला आहे तर 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.