'खरे बंटी बबली कोण?' सैफ अन् राणी दोघेही हैराण...

बॉलीवूडचे सुपरस्टार सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांचा सुरूवातीला हम तुम चित्रपट आला.
'खरे बंटी बबली कोण?' सैफ अन् राणी दोघेही हैराण...

बॉलीवूडचे सुपरस्टार सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांचा सुरूवातीला हम तुम चित्रपट आला. त्यामध्ये त्यांच्या केमिस्ट्रीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्यांची बंटी आणि बबलीमध्ये वर्णी लागली आहे. सोशल मीडियावर त्याचा टीझर व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत. बंटी और बबलीच्या पहिल्या भागामध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी काम केले होते. त्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांचीही भूमिका होती. सध्या सोशल मीडियावर रिलिज झालेल्या टीझरला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

बंटी आणि बबलीच्या दुसऱ्या भागामध्ये आता दोन दोन बंटी बबली दिसून येणार आहेत. बारा वर्षांनंतर राणी मुखर्जी आणि सैफ अली खान एकत्रित दिसणार आहे. त्यात त्यांच्या सोबत गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी आणि शाखरी दिसणार आहे. बंटी आणि बबलीच्या 2 टीझरनं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. त्या टीझरमध्ये आपल्याला दिसून येते की, सैफ अली खान आणि राणी मुखर्जी हे मेक अप करत आहेत. मात्र त्याचवेळी त्याठिकाणी सिद्धांत चतुर्वेदी आणि शाखरी येतात. ते त्यांचा परिचय देतात तेव्हा राणीला राग येतो. आणि ती त्यांना विचारते की, तुम्ही कोणा आहात, त्यावर ते म्हणतात, आम्ही बंटी बबली २ दोन आहोत. आम्हाला आदित्य चोप्रानं साईन केलं आहे.

त्यांचं उत्तर ऐकून सैफ आणि राणीला नवल वाटते. आणि ते दोघेही आपआपल्या मेकअप रुममध्ये जातात. बंटी आणि बबलीच्या दुसऱ्या भागाला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चननं भूमिका केल्या होत्या. त्यामध्ये अमिताभ यांचीही प्रमुख भूमिका होती. आता 15 वर्षांनंतर बंटी आणि बबलीचा सीक्वेल प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

'खरे बंटी बबली कोण?' सैफ अन् राणी दोघेही हैराण...
आर्यन खान आणि नवाब मलिक दोन वेगळे विषय - गृहमंत्री
'खरे बंटी बबली कोण?' सैफ अन् राणी दोघेही हैराण...
Bandra: सलमान खान ड्युप्लेक्स फ्लॅटसाठी महिन्याला मोजतोय लाखोंचं भाडं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com