

Social Media Viral News: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा नेहमीच प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावरील त्या व्हिडिओला शेयर करुन अनेकजण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवतात. यामुळे (Ranu mandal) कित्येकांना मोठा आर्थिक फायदाही झाला आहे. त्यात रस्त्यावर गाणाऱ्या राणु मंडलला टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील एका बड्या रियॅलिटी शो मध्ये बोलावण्यात आले होते. कच्चा बादाम फेम भुवन बादरायणला देखील प्रसिद्धी (Kaccha Badam) मिळाली होती. आताही एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यातील एक आजोबांनी ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्या चांदणी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्याला नेटकऱ्यांनी मोठा प्रतिसादही दिला आहे. तो डान्स आता देशभर व्हायरल झाला आहे.
ओ मेरी चांदनी या गाण्यावर डान्स करणाऱ्या त्या आजोबांचे नाव आहे विजय (Social media viral news) खरोटे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तो व्हिडिओ शेयर केला आहे.त्यावर नेटकऱ्यांनी त्यांचं कौतूक केलं आहे. आजोबांची (viral video) ती पोस्ट शेयर करताना संबंधित व्हिडिओ क्रिएटरनं लिहिलं आहे की, आजोबांचा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे. त्यांचा डान्सही कमालीचा (Entertainment News) लक्षवेधी आहे. खरोटे आजोबांविषयी सांगायचे झाल्यास त्यांनी यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेयर केले होते. त्याला देखील नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतले होते. आताच्या ओ मेरी चांदनी गाण्याच्या व्हिडिओला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. एका युझर्सनं कमेंट दिली आहे की, वा आजोबा तुमच्या उत्साहाची दाद द्यायला हवी.
खरोटे आजोबांना इंस्टावर 65 हजार फॉलोअर्स आहेत. दुसऱ्या एका युझर्सनं लिहिलं आहे की, आनंदी राहण्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट वयाची अट नाही. हे या आजोबांकडे पाहिल्यावर कळते. खरोटे आजोबा आपल्या सुंदर सादरीकरणासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आजोबांनी ज्या गाण्यावर डान्स केला आहे ते गाणं 1989 मध्ये आलेल्या चांदनी या चित्रपटातील आहे. त्यात मुख्य अभिनेता म्हणून ऋषी कपूर, श्रीदेवी यांनी काम केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.