esakal | कार्तिकच्या 'फ्रेडी'ची चर्चा ; 14 किलो वजन वाढवलंय!
sakal

बोलून बातमी शोधा

कार्तिकच्या 'फ्रेडी'ची चर्चा; 14 किलो वजन वाढवलंय!

कार्तिकच्या 'फ्रेडी'ची चर्चा; 14 किलो वजन वाढवलंय!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - चित्रपटामध्ये आपली भूमिका चांगली व्हावी या उद्देशानं अनेक अभिनेते वेगवेगळ्या प्रकारे वर्कआऊट करताना दिसून आले आहेत. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट त्यासाठी विशेष ओळखला जातो. त्यानं यापूर्वी गझनीसाठी, दंगल आणि आता लाल सिंग चढ्ढासाठी त्यानं आपल्या लूकवर मेहनत घेतल्याचे दिसून आले आहे. आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवणारा अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनचं नाव घेता येईल. आपण नेहमीच चित्रपटात अभिनेत्यांनी भूमिकेसाठी शरीर कमावले किंवा वजन घटवले अशा कथा ऐकतो मात्र, काही मोजकेच अभिनेते असे आहेत ज्यांनी भूमिकेच्या आवश्यकतेनुसार वजन वाढवण्यासाठी देखील स्वतःवर वेगळ्या दृष्टिकोनातून काम केले आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने असे केले होते आणि आता अभिनेता कार्तिक आर्यनने देखील असेच काहीसे केले आहे. जवळपास 10 दिवसांच्या रेकॉर्ड वेळेत आपला चित्रपट 'धमाका' पूर्ण केल्यानंतर, या लोकप्रिय अभिनेत्याने 'फ्रेडी'साठी देखील असेच काहीसे जबरदस्त केले. कार्तिकने जवळपास 12 ते 14 किलो वजन वाढवले आहे, जो एकता कपूरच्या फ्रेडीमधील त्याच्या भूमिकेसाठी आवश्यक होते. 'फ्रेडी' हा एक रोमांटिक थ्रिलर असून अनेक अनपेक्षित ट्विस्ट आणि टर्न्सने पुरेपूर असा चित्रपट आहे. अनेकदा अभिनेत्यांसाठी उत्तम शरीरयष्टी राखणे आवश्यक असते, मात्र जेव्हा कार्तिकला त्याच्या फ्रेडीमधील व्यक्तीरेखेसाठी वजन वाढवण्याची गरज सांगण्यात आले तेव्हा, त्याने यासाठी लगेचच तयारी दर्शवली. कार्तिकाने आपल्या व्यक्तीरेखेच्या आवश्यकतेसाठी आपला ट्रेनर समीर जौरासोबत आपल्या शरीरावर काम करणे सुरू केले. समीरला बॉडी ट्रांसफॉर्मेशनमधील तज्ज्ञ मानण्यात येते आणि त्याने आपल्या ट्रांसफॉर्मेशन जर्नीमध्ये बॉलीवुडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

कार्तिक आर्यनसोबतच्या या कामाविषयी समीर म्हणतो, “ट्रांसफॉर्मेशन केवळ बारीक होणे किंवा शरीर कमावणे, इतपतच सीमित नसून कधी-कधी यात शरीरातील फॅट्स वाढवण्याचा देखील समावेश असतो, ज्याला खूपच सुपरवाइज़्ड आणि सुरक्षित पद्धतीने करावे लागते. कार्तिक शिस्त, त्याच्यासाठी बनवण्यात आलेला वर्कआउट प्लान आणि योग्य एटसोबत हा लुक प्राप्त करण्यासाठी 14 किलो वजन वाढवण्यासाठी सक्षम होता. त्याचे डेडिकेशन अविश्वसनीय होते कारण तो जेनेटिकली लीन असल्याने आपल्या भूमिकेसाठी एका ठरलेल्या कालावधीत एवढे वजन वाढवणे, खरोखरच कौतुकस्पद आहे. एवढेच नाही तर, फ्रेडीसाठी वाढवलेले वजन त्याने आपल्या आगामी चित्रपटासाठी कमी करणे देखील सुरू केले आहे."

हेही वाचा: VIDEO : कार्तिक आर्यन हरवला जंगलात अन् पोलिसांनी काढली 'सेल्फी'

हेही वाचा: कार्तिक आर्यन म्हणतोय, 'आज खुश तो बहुत होगे तुम' !

loading image
go to top