Kashmir Files ला दुबईत 'ग्रीन' सिग्नल; एकही दृष्य न वगळता 'स्क्रिनिंग'

बॉलीवूडमध्ये सध्या विवेक अग्निहोत्री द काश्मीर फाईल्सची (Bollywood News) मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
the Kashmir files
the Kashmir filesesakal

The Kashmir Files: बॉलीवूडमध्ये सध्या विवेक अग्निहोत्री द काश्मीर फाईल्सची (Bollywood News) मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर फाईल्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी काश्मीर फाईल्सवर सोशल (Vivek Agnihotri) मीडियातून टीका केल्याचे दिसून आले आहे. आतापर्यत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं दोनशे कोटीपेक्षा अधिक कमाई केल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे या चित्रपटाला राजकीय, धार्मिक रंग चढला आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. त्यांनी काश्मीर पंडितांची वेदना जगासमोर मांडून त्यातून ते पैसे कमावले आहेत ते आता त्यांच्या विकासासाठी वापरण्यात यावे. अशी मागणी केली होती. सोशल मीडियावर त्याची चर्चा होती.

काश्मीर फाईल्सविषयी सध्या मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दुबईमध्ये (UAE) काश्मीर फाईल्सच्या स्क्रिनिंगला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. अग्निहोत्री यांनी जेव्हा या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा त्यांच्यावर मुस्लिमांचे नकारात्मक चित्रण करणारा चित्रपट तयार केल्याची टीका करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर दुबईसारख्या देशानं दिलेला ग्रीन सिग्नल हा महत्वाचा मानला जातोय. नुकतचं अग्निहोत्री यांनी आपल्याला ब्रिटिश संसदेनं काश्मीर पंडितांच्या विषयावर चर्चेसाठी बोलावणं आल्याचे सांगितलं आहे. पुढील महिन्यात ते आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी त्यासाठी जाणार आहेत. दुबईमध्ये काश्मीर फाईल्स कुठल्याही कटसविना प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

the Kashmir files
Viral Song : 'चंद्रमुखी'च्या दिलखेचक अदा: अमृतावर कौतुकाचा वर्षाव

अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्सनं बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं आहे. या चित्रपटामध्ये पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर यांच्या भूमिका आहेत. 1990 मध्ये काश्मीरी पंडितांवर जे अन्याय, अत्याचार झाले त्यावर भाष्य या चित्रपटामध्ये करण्यात आले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याच्यावर अनेकांनी आक्षेप घेतले होते. त्याच्यावर तो धार्मिक असल्याचा आणि राजकीय प्रचारासाठी तयार करण्यात आलेला चित्रपट अशीही टीका करण्यात आली होती. दुबईबरोबरच हा चित्रपट सिंगापूरमध्येही लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

the Kashmir files
RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com