
Ganesh Acharya Bail: 'ऊ अंटावा' चा कोरिओग्राफर गणेश आचार्यला जामीन
Bollywood News: बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य हा त्याच्या (Ganesh Acharya) एका कृत्यामुळे चर्चेत आला आहे. त्याच्यावर एका युवतीनं लैंगिक छळाचा आरोप केला होता. (Bollywood celebrities) दोन वर्षांपूर्वी त्यानं त्या महिलेला मारहाण आणि तिचं शाररिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता कोर्टानं त्याला जामीन दिला आहे. 2020 च्या फेब्रुवारीमध्ये अंबोली पोलिसांनी गणेशवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची सहकारी कोरिओग्राफर्सनं त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
गणेशवर झालेल्या आरोपामुळे त्याची मोठी बदनामी झाली होती. बॉलीवूडमध्ये (Bollywood movies) गेल्या तीन दशकांहून अधिक काळ चर्चेत असणारा आणि काम करणारा कोरिओग्राफर्स म्हणून गणेशची ओळख आहे. तो प्रभावी डान्सर आहे. त्यानं बॉलीवूडमधील वेगवेगळ्या अभिनेत्यांना डान्स शिकवत त्यांना स्टार केले आहे. 2000 च्या दशकांपासून गणेशनं अनेक चित्रपटांचे कोरिओग्राफर्स म्हणून काम केले होते. गेल्या वर्षी त्याचा पुष्पा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा त्यातील उ अंटावा गाण्यासाठी देखील त्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती.
मुंबईच्या सत्र न्यायालयाकडून गणेशला जामीन मिळाला आहे. घटना अशी होती की, एक महिला 2009 ते 10 च्या दरम्यान एक महिला गणेशला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेली होती. त्यावेळी गणेशनं तिला काही पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिनं गणेशच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्या घटनेत गणेशला काही अटक करण्यात आली नव्हती. त्याला 23 जुन रोजी कोर्टासमोर हजर कऱण्यात आले होते.
हेही वाचा: Video: 'रेनबो'च्या सिनेमाचं लंडनमध्ये श्रीगणेशा
फिर्यादीचे म्हणणे होते की, आणखी दोन जणांसोबत देखील गणेशनं अशाप्रकारचे कृत्य केलं आहे. मात्र ते भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नाही. फिर्यादी महिलेसोबत यापूर्वी देखील लैंगिक शोषण झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.
हेही वाचा: Tollywood Vs Bollywood: 'भाषेचं काय घेऊन बसता, सगळचं...' आलिया बिनधास्त बोलली
Web Title: Bollywood Movies Choreographer Ganesh Acharya Granted Bail Harassment Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..