'राजेश खन्ना यांच्यामुळे चित्रपटांचा घसरला दर्जा'

बॉलीवूडमध्ये जे काही वादग्रस्त सेलिब्रेटी आहेत त्यापैकी एक नसरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) यांच्या नावाचा उल्लेख करता येईल.
'राजेश खन्ना यांच्यामुळे चित्रपटांचा घसरला दर्जा'

मुंबई: बॉलीवूडमध्ये जे काही वादग्रस्त सेलिब्रेटी आहेत त्यापैकी एक नसरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) यांच्या नावाचा उल्लेख करता येईल. ते एक ज्येष्ठ अभिनेते आहेत. ते सोशल मीडियावरही बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असतात. आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ते परिचित आहेत. भवतालच्या परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी करण्यासाठी त्यांची ओळख आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण तसेच मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या गोष्टींवर सडेतोडपणे मत प्रकट करणारे अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सध्या नसरुद्दीन शहा हे चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर टीका केलीय. अर्थात ती टीका राजेश खन्ना यांच्या चाहत्यांच्या जिव्हारी लागली आहे. नसरुद्दीन शहा यांनी एकुणच बॉलीवूडच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

७१ वर्षांच्या नसरुद्दीन शहा यांचा बॉलीवू़डमधील प्रवास अजूनही दमदारपणे सुरु आहे. त्यांनी आतापर्यत वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. त्यांची भूमिका पाहणं हा प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. जाणकार प्रेक्षक, रसिक, समीक्षक, अभ्यासक यांनीही नसरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केलं आहे. मात्र केवळ कौतूकावर शहा हे खूश नाही. त्यांनी आता जे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते ट्रोल होताना दिसत आहे. त्याचे कारण त्यांनी राजेश खन्ना यांच्यावर परखड शब्दांत केलेली टीका. बॉलीवूडला फार जवळून पाहणाऱ्या नसरुद्दीन शहा यांनी १९७० च्या काळातील बॉलीवूडच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

नसरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) म्हणाले, १९७० च्या काळात बॉलीवूडमधील चित्रपटांचा दर्जा जो कमी झाला त्याला कारणीभूत राजेश खन्ना यांचे चित्रपट होते. आताही तिच परिस्थिती आहे जी तेव्हा होती. फारसं काही बदलेलं नाही. फोटोग्राफी आणि एडिटिंगमध्ये बदल झाला आहे. थोडाफार बदल झाला आहे. मात्र आपल्याकडचे विषय अजूनही तेच आहेत. जे पूर्वी होते. ७० च्या दशकातील विषयांवर आपण अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती तयार करतो आहोत. अशी टीका नसरुद्दीन यांनी काही निर्माते आणि दिग्दर्शकांवर केली आहे. यासगळ्यासाठी राजेश खन्ना हे जबाबदार असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

'राजेश खन्ना यांच्यामुळे चित्रपटांचा घसरला दर्जा'
'बाबुमोशाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये'; राजेश खन्ना यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घ्या त्यांचा प्रवास
'राजेश खन्ना यांच्यामुळे चित्रपटांचा घसरला दर्जा'
राजेश खन्ना हे खरे रोमँटिक सुपरस्टार

वास्तविक राजेश खन्ना यांच्या स्टारडमविषयी अनेकांना आदर आहे. त्यांच्या अभिनयावर प्रेम करणारे चाहते आजही आहे. मात्र काही अभिनेत्यांना राजेश खन्ना यांच्या अभिनयाचे वावडे असल्याचे दिसून आले आहे. त्यात अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. एका मुलाखतीमध्ये जेव्हा नसरुद्दीन यांना राजेश खन्ना आणि बॉलीवूडविषयी प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी त्या प्रश्नाला टीकात्मक उत्तर दिले होते. त्यामुळे राजेश खन्ना यांच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com