Friday Released : शुक्रवारीच का होतात चित्रपट प्रदर्शित? काय आहे कारण?|Bollywood News Why do movies release | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood movie news

Friday Released : शुक्रवारीच का होतात चित्रपट प्रदर्शित? काय आहे कारण?

Why do movies release on Friday: बॉलीवूड इंडस्ट्री ही जगभरामध्ये सर्वाधिक बिझनेस करणारी मनोरंजन इंडस्ट्री आहे. दरवर्षी भारतात 500 हून अधिक चित्रपट प्रदर्शित होतात. यातील बहुतांशी चित्रपट त्यातील वितरणाच्या प्रक्रियेतील त्रुटीमुळे (Bollywood News) प्रेक्षकांना माहिती होत नाही. काही केवळ फेस्टिव्हलसाठी तयार होतात. तर काही नेहमीप्रमाणे शुक्रवारी प्रदर्शित होतात. चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित होतात हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. या दिवशी चित्रपट प्रदर्शित होण्याची सुरुवात कशी काय झाली, हे आपण जाणून घेणार आहोत. शुक्रवारची (Friday Released) निवड करण्यामागे निर्मात्यांचे आर्थिक गणित काय आहे हेही आपण माहिती करुन घेणार आहोत.

असं म्हटलं जातं की भारतात शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याची सुरुवात हॉलीवूडपासून झाली. तो जुना ट्रेंड आहे. 15 डिसेंबर 1939 रोजी हॉलीवूडचा गॉन (Hollywood movie) विथ द विंड शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर भारतात 1960 पूर्वी अमुक एखाद्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याची पद्धत नव्हती. 1947 सालच्या 24 मार्च रोजी भारतात नील कमल नावाची फिल्म रिलिज झाली होती. त्यादिवशी सोमवार होता.

मुघले आझम हा पहिला चित्रपट

तुम्हाला कदाचित मुघले आझम चित्रपटाबाबत एक गोष्ट माहिती नसेल ती म्हणजे 5 ऑगस्ट 1960 रोजी शुक्रवारच्या दिवशी प्रदर्शित केला गेला. त्या चित्रपटाला मोठं यश मिळालं. त्याचं खूप कौतूकही झालं. त्याच्या वाट्याला अमाप लोकप्रियताही आली. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मुघले आझमचं नेहमीच उदाहरण दिलं जातं. त्यानंतर हॉलीवूडची कॉपी भारतातही व्हायला लागली. आणि आपल्याकडे शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली. दुसरं एक कारण म्हणजे आपल्याकडे मुंबई सारख्या शहरांमध्ये शुक्रवारच्या दिवशी कर्मचारी वर्गाला दुपारी सुट्टी मिळायची. अर्ध्या दिवसाची ती सुट्टी कशी घालवायची तर अनेकजण यावेळी चित्रपट पाहून तो दिवस साजरा करत. आता एखादा सण, उत्सव पाहून चित्रपट साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. जसं की यंदाच्या वर्षी केजीएफ 2 हा गुरुवारच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता.

शुक्रवारचा दिवस असतो शुभ....

अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडून शुक्रवारच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचा हट्ट धरला जातो. यामागे अनेकांची वेगळी भावना अथवा श्रद्धा आहे. ती म्हणजे शुक्रवारचा दिवस शुभ असतो. यादिवशी एखाद्या मोठ्या कामाची सुरुवात केल्यास त्याचा आपल्याला फायदा होतो. अशी त्या दिवसामागील भावना आहे. त्यामुळे अनेकांनी शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. अर्थात बॉलीवूड आणि ज्योतिष याचे पूर्वीपासून अनोखे नाते असल्याचे दिसून येईल. वेगवेगळे अभिनेते, अभिनेत्री ज्योतिषाचा सल्ला घेऊन चित्रपटाच्या मुहूर्ताला सुरुवात करत असल्याच्या बातम्याही व्हायरल झाल्या आहेत.

वीकेंडचा होतो मोठा फायदा -

शुक्रवारीच चित्रपट प्रदर्शित करण्यामागे एक व्यावसायिक हेतू असल्याचे समोर आले आहे. निर्मात्यांचा विचार असा की, शुक्रवार नंतर शनिवार आणि रविवार हे दोन आठवडा सुट्टीचे दिवस असल्यानं त्याचा फायदा चित्रपटाला होतो. अनेकांना पुढील दोन दिवशी चित्रपटाचा आनंद घेता येणं शक्य असते. मात्र त्यामागील आर्थिक गणित पूर्णपणे वेगळे आहे. शनिवार, रविवार अनेक कार्यालये, कॉलेज यांना असणाऱ्या सुट्ट्या लक्षात घेऊनही त्याच दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्यात येतात. हल्ली एखाद्या सणाच्या दिवशी, किंवा प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Bollywood News Why Do Movies Release On Friday Interesting Answer Inspired By Hollywood

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top