Bollywood: ...म्हणून पाकिस्तानी अभिनेत्याने नाकारले होते बॉलिवूडचे चित्रपट

Bollywood
Bollywoodesakal

बॉलिवूडमध्ये अनेक विदेशी कलाकारांनी आपले नशीब आजमावले आहे. त्यात पाकिस्तानी इंडस्ट्रीतील अनेक स्टार्संचा सामावेश आहे. पाकिस्तानी चित्रपट उद्योग म्हणजेच लॉलीवूडमधील कलाकारांना हिंदी चित्रपट उद्योगात काम करण्यास बंदी आहे. पण, एके काळी शेजारील देशाचे कलाकारही आपलं नशीब चमकवण्यासाठी इथं यायचे.

याचदरम्यान पाकिस्तानी अभिनेता हमजा अली अब्बासी याने बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि वरुण धवन यांच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर नाकाऱ्याचा खुलासा केला आहे.

Bollywood
Bollywood Movie: नोव्हेंबर महिन्यात भेटेल ‘या’ चित्रपटांची मेजवानी...

अभिनेता हमजा अली अब्बासी हा पाकिस्तानच्या प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. हमजा अब्बासी याचा 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपट चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटातील हमजाच्या कामाचेही चांगले कौतुक होत आहे. त्याला वरुण धवनच्या 'जुडवा 2'  चित्रपटात काम करण्याची ऑफर आली होती, पण त्याने ती नाकारली. यामागचे कारणही अभिनेत्याने उघड केले आहे.

त्याच्या सागंण्यानुसार  चित्रपटाला नकार देण्याचे मुख्य कारण भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेले संबंध आहे. दरम्यान, पाकिस्तानी कलाकारांवरही भारतात बंदी घालण्यात आली होती. याशिवाय चित्रपटात असे काही सीन्स होते, जे करणे त्याला योग्य वाटले नाही. 'जुडवा 2'  चित्रपट काही कमाल दाखवु शकला नव्हता.

Bollywood
Akshay Kumar: अक्षयच्या घरचं लक्ष्मीपुजन तुम्ही बघितलं का?

त्याचबरोबर त्याला अक्षय कुमारच्या 'बेबी' चित्रपटातही काम करण्याची संधी मिळाली होती मात्र त्यांने या चित्रपटालाही नकार दिला. कारण 'बेबी' हा एक राजकीय थ्रिलर होता आणि या चित्रपटात पाकिस्तानविरोधी आशयही होता. यामूळे त्याने तो नाकारला पण हमजाच्या नकारानंतर आणखी एका पाकिस्तानी अभिनेता मिकाल झुल्फिकारने ही भूमिका साकारली होती. बेबी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने बक्कळ कमाई देखील केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com