Jhoome Jo Pathaan: चोरटा पठाण! कार्टून फिल्मचं गाणं शाहरुखनं चोरलं...

Jhoome Jo Pathaan
Jhoome Jo Pathaanesakal

Pathaan Controversy: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला ग्रहण लागल्याचं दिसतयं. किंग खानच्या आगामी 'पठाण' हा चित्रपट रिलीज होण्याआधीच नवनविन वाद तयार होत आहे. पठाण चित्रपटाच्या बेशरम रंग या पहिल्या गाण्यावरून सर्वत्र चांगलाच वाद तयार झाला तो वाद कमी होत नाही तोच या चित्रपटाचं दुसरं गाणं आलं.

बेशरम रंग या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीला विरोधकांनी मोठा मुद्दा बनवला आहे. तिच्या कपड्यांबाबतचं वाद कमी होतं नाही तोच त्याच्या चित्रपटाच्या दुसऱ्या गाण्यावरही आता चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

Jhoome Jo Pathaan
Jhoome Jo Pathaan: बेशरम रंगच्या वादात..झूमे जो पठाणची जबरदस्त एंट्री

चित्रपटातील दुसरं गाणं 'झूमे जो पठाण' काल रिलीज करण्यात आले आहे. सध्या ते यूट्यूबवर ते ट्रेंडिंगला आहे. या गाण्यात दीपिका आणि शाहरुखची अतिशय बोल्ड स्टाईल पाहायला मिळत होती. एकीकडे गाणं काही लोकांच्या पसंतीस पडत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर ट्विटरच्या प्रतिक्रियेबद्दल पाहिलं तर काही वेगळ चित्र पहायला मिळतंय. काही लोकांना हे गाणे आवडलेलं नाही.

Jhoome Jo Pathaan
Jhoome Jo Pathaan: 'शाहरुखचं काही खरं नाही!' आता 'झुमे जो पठाण' मधून दीपिकानं....

गाण्यापेक्षा शाहरुख आणि दीपिकाला एकत्र पाहणं काही लोकांना आवडलं. पण आता या गाण्यावरही नवीन वाद होण्याची शक्यता आहे. आधीही या चित्रपटाच्या बेशरम रंग हे गाणं कॉपी केल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला होता, त्यामुळे आता मेकर्सवर झूम जो पठाणची धूनही चोरल्याचा आरोप केला जात आहे.

Also Read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सोशल मीडिया यूजर्स संगीतकार विशाल आणि शेखर यांच्यावर या गाण्याची धून चोरल्याचा आरोप करत आहेत. हा गाणं चोरीचं असल्याचा दावा करण्यात येत आहे. 'अर्जुन: द वॉरियर्स प्रिन्स' या चित्रपटातील 'कर्मा की तलवार' ह्या गाण्याची धून तंतोतंत या गाण्याशी मिळते आहे. त्यामूळे 'झूमे जो पठान' हे गाणं चोरीचं असल्याचं सोशल मीडिया यूजर्सचं म्हणणं आहे. 'कर्मा की तलवार' हे गाणं सुखविंदर सिंग यांनी १० वर्षांपूर्वी गायलं होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com