Republic Day 2023: राझी ते उरी पर्यंत, घरबसल्या ओटीटीवर पाहा हे देशभक्तीपर चित्रपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood patriotic movies

Republic Day 2023: राझी ते उरी पर्यंत, घरबसल्या ओटीटीवर पाहा हे देशभक्तीपर चित्रपट

देशभरात 26 जानेवारी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्वत्र देशभक्तीचे वातावरण असते. अशा परिस्थितीत 26 जानेवारीला तुम्हीही OTT वर घरबसल्या देशभक्तीवर आधारित चित्रपट पाहून तुमचे मनोरंजन करू शकता. आम्ही तुम्हाला अशा बॉलीवूड चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये देशभक्तीची भावना दाखवण्यात आली आहे. तसेच हे उत्तम चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील.

शेरशाह (Shershaah)

सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशाह' हा चित्रपट देशभक्तीचे उदाहरण देणारा उत्तम चित्रपट आहे. कारगिल युद्धाचा नायक आणि भारतीय लष्कराचा शूरवीर विक्रम बात्रा यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट देशभक्ती या विषयावर बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर सिद्धार्थचा हा चित्रपट पाहू शकता.

भुज- द प्राइड ऑफ इंडिया (Bhuj-The Pride Of India)

१९७१ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची कथा दाखवणारा सुपरस्टार अजय देवगणचा 'भुज - द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकाल. या चित्रपटात अजय व्यतिरिक्त बॉलीवूड अभिनेता संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही आणि एमी व्रिक मुख्य भूमिकेत आहेत.

उरी: द सर्जिकल स्ट्राइक (Uri-The Surgical Strike)

अभिनेता विक्की कौशलचा सुपरहिट चित्रपट 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' हा भारतीय लष्कराने 2016 मध्ये पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या कथेवर आधारित आहे. तुम्ही हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म G5 वर पाहू शकाल.

मिशन मजनू (Mission Majnu)

सिद्धार्थ मल्होत्राचा नुकताच प्रदर्शित झालेला 'मिशन मजनू' हा चित्रपट या यादीतून कसा वगळला जाऊ शकतो? या चित्रपटात एका भारतीय गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहण्यासाठी उपलब्ध असेल.

सिद्धार्थ मल्होत्राचा नुकताच प्रदर्शित झालेला 'मिशन मजनू' हा चित्रपट या यादीतून कसा वगळला जाऊ शकतो? या चित्रपटात एका भारतीय गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहण्यासाठी उपलब्ध असेल.

राजी (Raazi)

बॉलीवूडची सुपरस्टार आलिया भट्टचा चित्रपट 'राझी' हा एक उत्तम देशभक्तीपर चित्रपट आहे. या चित्रपटात आलियाने एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.

रंग दे बसंती (Rang De Basanti)

सुपरस्टार आमिर खानचा मल्टीस्टारर चित्रपट 'रंग दे बसंती' हा देखील एक उत्तम चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथेत भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा त्याग दाखवण्यात आला आहे. तसेच, सध्याच्या काळात तरुणाई स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान कसे विसरत चालली आहे, हेही हा चित्रपट सांगतो. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहायला मिळेल.