'मला खूप लोकांचे कॉल येतात अन्..',सुशांतच्या बान्द्यातील घराविषयी एजंटचा नवा खुलासा Sushant Singh Rajput | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood: People want to buy Sushant Singh Rajput's apartment, Real Estate Agent reveal

Sushant Singh Rajput: 'मला खूप लोकांचे कॉल येतात अन्..',सुशांतच्या बान्द्यातील घराविषयी एजंटचा नवा खुलासा

Sushant Singh Rajput: सुशांत सिंग राजपूत बान्द्यातील ज्या घरात रहायचा त्या घराविषयी दोन दिवसांपूर्वी काही बातम्या कानावर पडल्या अन् त्यामुळे जोरदार चर्चा रंगलेली पहायला मिळाली. कानावर पडलं होतं की गेली दोन वर्ष झाले तरी तो फ्लॅट भाड्यानं घ्यायला कुणीही तयार होत नाहीय. एक कारण समोर आलं होतं की मालकानं घराचं भाडं ४ वरनं ५ लाखावर आणलंय तर दुसरं कारण बोललं जात होतं मालकाला हा फ्लॅट कुणा बॉलीवूडकराला द्यायचा नाहीय, पण या दोन्ही कारणात तथ्य नसल्याचं आता समोर आलं आहे. (People want to buy Sushant Singh Rajput's apartment, Real Estate Agent reveal

हेही वाचा: Ananya Panday: 'हिच्या खांद्यावर पदर टीकेना!' अनन्या OOPS Moment ची शिकार....

रिअल इस्टेट एजंट रफिक मर्चंट हा एजंट सुशांत राहत असलेल्या फ्लॅटला भाडोत्री शोधण्याचं काम सध्या पाहत आहे. पण अद्याप फ्लॅटविषयी कोणताही व्यवहार होऊ शकलेला नाही हे मर्चंट कडूनच कळलेलं आहे. त्यावर मर्चंटनेच आता खुलासा करत सांगितलं आहे की, ''सुशांत त्या फ्लॅटमध्ये रहायचा,त्यानं तिथे आत्महत्या केली आहे म्हणून कुणी तिथे रहायला येत नाही अशा ज्या बातम्या पसरल्या आहेत त्या धादांत खोट्या आहेत. मूळ कारण आहे त्या फ्लॅटच्या भाड्याची वाढलेली किंमत. त्या विभागातील इतर घरांच्या तुलनेत ती जास्त आहे. जर किंमतीत घरमालकानं कमी-जास्त केलं तर लगेच त्या फ्लॅटची डील होईल. उलट,लोकांना सुशांत राहत होता हे घर पहायचे आहे,तिथे येऊन रहायचे आहे, मला अनेक कॉल येतात त्यासाठी''.

हेही वाचा: Vidya Balan Video: भर पार्टीत कॅमेऱ्यासमोरच विद्याच्या साडीच्या निऱ्या सुटल्या,पदरानेही दिला दगा...

मर्चंट पुढे म्हणाला,''ही वेळ घराच्या डीलसाठी योग्य आहे. अनेक जण या दिवसांत नव्या घरात शिफ्ट होत आहेत,घरं बदलत आहेत. घर आता बातम्यांमध्ये आहे ते खूप दिवसांपासून ते रिकामे असल्यामुळे. एकदा ते भाडे तत्वावर कुणीतरी घेतले तर कुणीही त्याच्याविषयी बोलणार नाही. खूप जणं येतात घर पहायला. अनेकांना तर ते घर विकत घ्यायचे आहे. पण सध्या मालकाचा ते घर विकण्याचा काही हेतू नाही''.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हेही वाचा: शाहरुखची पहिली कमाई माहितीय? तेवढ्यात आज वडापावही येत नाही

''सुशांत राहत असलेले घर लवकरच भाडे तत्वावर दिलं जाईल,हा काही मोठा प्रश्न नाही. कुणीही इथे राहण्यासाठी घाबरताना दिसतंय असं मला तरी निदर्शनास पडलं नाही. मालकाने भाडं कमी केलं तर किंवा विकायचं ठरवलं तर लवकरच या फ्लॅटचे डील होईल'', असं एजंट रफिक मर्चंटने सांगितले.