Raj Thakre: राज ठाकरेंकडून अशोक सराफ यांचे कौतूक, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray
Ashok Saraf

Raj Thackeray: राज ठाकरेंकडून अशोक सराफ यांचे कौतूक, म्हणाले...

राज ठाकरे हे सध्या राजकारणाबरोबर मनोरंजन सृष्टीतही सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मनोरंजन क्षेत्रात त्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा ही आहे. हर हर महादेव या सिनेमासाठी राज ठाकरेंनी आवाज दिलेला आहे.

हेही वाचा: Raj Thackeray : राज ठाकरेंच्या किस्स्याने एकच हशा पिकला

 त्यामुळे व्हाईस ओव्हर करत असतांनाच्या आठवणी राज ठाकरे यांनी यावेळी सांगितल्या. चित्रपटात कष्ट घेणं महत्त्वाचं आहे. भलेही तो सिनेमा पडला तरी चालेल. पण त्यात कष्ट घेणं गरेजंचं असल्याचं त्यांनी म्हंटलं होतं. त्यामुळे कलाकारांच्या मेहनतीला ते भरभरुन  दादही देतात.

त्यांना चित्रपट आणि नाटकही पाहण्यास विशेष रस आसल्याचही त्यांनी सांगितलं होत. नुकताच त्यांनी अशोक सराफ यांचं 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिलं. हे नाटक पाहिल्यानंतर ते त्याची प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला थांबवूच शकले नाही. या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मिडियावर एक विशेष पोस्ट शेअर केली.

हेही वाचा: Video : Ashok Saraf यांनी विदुषकाची भूमिका केली आणि त्यांचं आयुष्यच बदललं

त्यात ते म्हणतात,‘नुकतंच मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या 'धक्क्याने' नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आलीच.पण वयाची ७५ पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झालं. निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता. ह्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील’. अत्यंत बारकाइने त्यांनी या नाचकाचं समीक्षण केलं.

हेही वाचा: Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भेटीनंतर तेजस्विनी पंडीतची पोस्ट चर्चेत; म्हणाली...

त्यांनी अशोक सराफ आणि त्यांच्या टिमसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्याच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी केमेंट केल्या आहे.अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचं व्हॅक्युम क्लिनरचा पहिला प्रयोग 25 ऑक्टोबरला गडकरी रंगयतन ठाणे येथे झाला.संपूर्ण आठवड्यात या नाटकाचे 4 प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळताय. यात हलकी फुलकी कॉमेडी करत मोलाचा संदेश या नाटकातुन मिळत आहे.