esakal | क्या बात है मेनन साब, दादासाहेब फाळके पुरस्कार आपके नाम 
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood popular actor kaykay menon win dadasaheb phalke award for most versatile actor social media post viral

अनुराग कश्यप दिग्दर्शित ब्लॅक फ्रायडे आणि गुलाल या चित्रपटात केकेनं अफलातून अभिनय़ केला होता. 

क्या बात है मेनन साब, दादासाहेब फाळके पुरस्कार आपके नाम 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी प्रसिध्द असणा-या बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता के के मेननला यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. अभिनयात अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल त्याला या पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याचे कळताच सोशल मीडियावर फॅन्सनं त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. केकेनंही पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी सर्वांना शेअर केली आहे. केवळ हिंदी नव्हे तर वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यानं केलेला अभिनय प्रेक्षकांना कमालीचा आवडला आहे. त्यामुळे एक लोकप्रिय अभिनेता आहे.

अनुराग कश्यप दिग्दर्शित ब्लॅक फ्रायडे आणि गुलाल या चित्रपटात केकेनं अफलातून अभिनय़ केला होता. या दोन्ही चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचे कौतूकही झाले होते. मात्र तेव्हापासून जाणकार प्रेक्षक, समीक्षक आणि अभ्यासक यांचे लक्ष केकेनं वेधून घेतले होते. याशिवाय विशाल भारव्दाजच्या हैदर चित्रपटातंही त्यानं केलेली भूमिका वाहवा मिळवणारी होती. केकेनं काही विनोदी भूमिकाही साकारल्या. हनिमून ट्रॅव्हल्स हे त्याचे उहादरण सांगता येईल. प्रेक्षकांनी त्याच्या य़ा भूमिकेलाही आनंदानं स्वीकारले. अशा अष्टपैलू अभिनयाला त्याच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे सन्मानित करण्यात आले आहे.

बॉलीवूडमध्येच केके मेनन प्रसिध्द आहे असे नाही तर गुजराती, तमिळ, तेलुगूमध्येही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारा केके सामाजिक कामांमध्येही सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये नुकताच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये महत्वाचा समजला जाणारा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात के.के मेननला अष्टपैलू अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

ज्येष्ठ गीतकाराच्या मदतीला नेहा धावली; 5 लाखांची केली मदत

रंगभूमीवरुन केकेनं अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला. काही मालिकांमध्ये  त्यानं काम केलं.  1995 सालात आलेल्या ‘नसीम’ या सिनेमात के.के मेननने एक लहानशी भूमिका साकराली होती. ‘भोपाळ एक्सप्रेस’ या सिनेमातून के.के मेनन मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. ब्लॅक फ्राईडे, सरकार, लाईफ इन मेट्रो, हैदर यारख्या सिनेमांमधून के.के मेननने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
 

 
 

loading image