esakal | ज्येष्ठ गीतकाराच्या मदतीला नेहा धावली; 5 लाखांची केली मदत 
sakal

बोलून बातमी शोधा

singer and Indian idol judge Neha kakkar gifted 5 lakh rupees to veteran lyricist santosh anand since he is out of work

गेल्या काही वर्षांपासून बिकट परिस्थितीला सामो-या जाणा-या गीतकार संतोष आनंद यांच्यासाठी नेहानं मदतीचा हात पुढे केला आहे.

ज्येष्ठ गीतकाराच्या मदतीला नेहा धावली; 5 लाखांची केली मदत 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  बॉलीवूड मध्ये आपल्या गायकीनं वेगळी ओळख निर्माण करणा-या नेहाची गोष्टच वेगळी आहे. तिनं अनेक संकटांना तोंड देऊन मोठा प्रवास केला आहे. ती केवळ तिच्या गायकीसाठी प्रसिध्द नाही प्रेमळ, मदतशील स्वभावामुळेही सर्वांना प्रिय आहे. तिच्या मदतशील स्वभावाचा प्रत्यय ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद यांना आला आहे. नेहानं त्यांना भरीव रक्कम मदत म्हणून दिली आहे.

सोशल मीडियावर नेहानं एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यात तिच्या मदतशील वृत्तीचा प्रत्यय दिसून आला आहे. गेल्या काही वर्षांपासून बिकट परिस्थितीला सामो-या जाणा-या गीतकार संतोष आनंद यांच्यासाठी नेहानं मदतीचा हात पुढे केला आहे. तिनं त्यांना 5 लाख रुपयांची मदत केली आहे. इंडियन आयडल टीमने त्यांच्या एका विशेष भागात प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांना देखील आमंत्रित केले आहे. संतोष आनंद यांनी प्रख्यात संगीतकार प्यारे लालजींसोबत काम केलेले आहे. त्यांनी सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याचे शोमध्ये सांगितले आहे.  त्याचा  प्रोमो व्हायरल झाला आहे.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना नेहा म्हणाली,  नेहाने भारतीय मनोरंजन उद्योगाला देखील संतोषजींना काम देण्यासाठी आवाहन केले. त्यावेळी त्यांना थोड्या फार प्रमाणात मदत करताना आपण त्यांना 5 लाख रुपये देत आहोत असे ती म्हणाली. इतकेच नाही, तर विशाल दादलानी यांनीही संतोषजींना त्यांची काही गाणी देण्याची विनंती केली जी रिलीज करण्याची जबाबदारी विशाल दादलानीने दर्शवली. नेहाने “एक प्यार का नग्मा” गीत म्हटले आणि संतोषजींनी देखील तिच्या सोबत काही ओळी याप्रसंगी म्हटल्या. सध्याच्या इंडियन आयडॉलच्या या वीकएंडला लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील प्यारेलाल जी हजेरी लावणार आहेत. हा एपिसोड प्रेक्षकांसाठी वेगळी पर्वणी असणार आहे.

हेही वाचा : कंगनाच्या सुरक्षेसाठी किती पैसा खर्च होतो? 

हेही वाचा : करीनाला पुत्ररत्न? सैफच्या बहिणीच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा

या विशेष भागात इंडियन आयडलच्या टीमने  गीतकार संतोष आनंद यांना देखील आमंत्रित केले आहे. संतोष आनंद यांनी प्यारे लालजींसोबत काम केलेले आहे. त्यांनी सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याचे शोमध्ये सांगण्यात आले आहे. त्यांच्या कर्जाविषयी ऐकून नेहाला वाईट वाटले होते. तिने संतोषजींना 5 लाख रुपये देण्याचे ठरवले. ती म्हणाली ते वेगळं व्यक्तिमत्वं आहे. त्यांचे नाव मोठे आहे.  
 

loading image