Richa Chadha Contraversy: ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अक्षय’; प्रकाश राज यांचा ऋचाला पाठिंबा तर अक्षयवर टिका...

Richa Chadha Contraversy
Richa Chadha ContraversyEsakal

‘गलवान’ ट्वीटनंतर बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा  चांगलीच चर्चेत आली आहे. गलवान प्रकरणात तिनं केलेल्या ट्वीटमुळे खळबळ माजली अन् लोकांनी तिच्यावर निशाणा साधला. रिचाला ट्रोल केलं जात आहे इतकचं नाही तर तिच्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे.

Richa Chadha Contraversy
Richa Chadha: 'लाज वाटली पाहिजे तुला असं बोलताना', केके मेनन रिचावर संतापला!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने देखील ट्वीट करत ऋचा चड्ढाच्या वक्तव्याची निंदा केली . त्यानं ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'हे पाहून मला खूप दुःख झालंय. आपल्या लष्कराबद्दल कृतघ्न राहणं योग्य नाही. त्यांच्यामुळेच आपण आहोत’ त्याच्याबरोबरचं अनुपम खेर, के के मेनन यांनीही तिच्या वक्तव्याची टिका केली होती. 

ऋचा चड्ढावर चारही बाजूने टिका होत असतांना, अभिनेते प्रकाश राज मात्र तिच्या समर्थनात पुढे आले आहे. प्रकाश राज यांनी ट्वीट करत अक्षय कुमारला चांगलची खरडपट्टी काढली आहे. प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटरवर लिहिले आणि लिहिले, "तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती @akshaykumar.. ,तुझ्या प्रतिक्रियेतून तू हेच दाखवून दिलंस की ऋचा चड्ढाची भूमिका तुझ्यापेक्षा अधिक योग्य आणि प्रासंगिक आहे.’#justasking."

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Richa Chadha Contraversy
Richa chadha: 'लष्कराचा अपमान करणाऱ्याला हा देश...',रिचा विरोधात चित्रपट निर्माते अशोक पंडितांची तक्रार

ऋचा चड्ढाची बाजू घेण्याची ही पहिलीचं वेळ नाही. या आधी देखील प्रकाश राज यांनी ऋचा चड्ढाच्या गलवान ट्वीटवर प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘ऋचा चड्ढा आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुला नेमकं काय म्हणायचंय त्याचा अर्थ आम्हाला माहित आहे.’

लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.या ट्विटवर प्रतिक्रिया देताना रिचा चड्ढा ने लिहिलं की, 'गलवान हाय बोलत आहे.' रिचाच्या या ट्विटनं खळबळ उडाली. सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनेत्री रिचा चढ्ढावर नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी रिचानं भारतीय लष्काराचा अपमान केल्याचं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com