Karan Johar: कुणीही सोबती नसल्याचं करणला दु:ख, मला कुणीच सोबती नाही!|Bollywood Producer-Director Karan Johar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karan johar news

Karan Johar: कुणीही सोबती नसल्याचं करणला दु:ख, मला कुणीच सोबती नाही!

Karan Johar: बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच त्याच्या आयडेंटिडीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. करणनं आपण कोण आहोत हे सांगण्यास कधीही भीती बाळगली नाही. मात्र (Bollywood Producer) नेटकऱ्यांनी त्याला नेहमीच त्यावरुन ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. सध्या करण जोहर हा एकटाच असून त्याला कुणी पार्टनर नाही. असं तो (Social media) म्हणतो आहे. सतत कामाच्या व्यापात स्वताला गुंतवून घेतल्यानं मला बाकीच्या गोष्टींच्या बाबत विचार करण्यास वेळ नसल्याचे करण जोहरनं म्हटले आहे. माझे दु:ख काय आहे मलाच माहिती आहे. बाकी कुणाला मी काही सांगु शकत नाही. वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते. जे मी दिले नाही. याची खंत असल्याचे करणनं म्हटलं आहे.

बॉलीवूडमध्ये आपल्या हटके चित्रपटांसाठी ओळखले जाणारा दिग्दर्शक म्हणून (entertainment news) करणची वेगळी ओळख आहे. करणनं एका मुलाखतीमध्ये आपल्याला वैयक्तिक आयुष्याविषयी काय वाटते याविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याची सध्या चर्चा आहे. माझ्याकडे असणाऱ्या कामामुळे मला कुणासाठी खास वेळ काढता येत नाही. असे करण जोहरचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम माझ्या नात्यावर होत असल्याचे करणनं सांगितले आहे. करण हा आता भारतातील सर्वात मोठा निर्माता आहे. त्यानं टॉलीवूडमधील अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

हेही वाचा: Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...

करण हा नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वरुन चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यात त्याच्या व्यक्तिमत्वाची टिंगल झालेली आपण पाहिली आहे. सलमाननं त्याला विचारलेला प्रश्न असो किंवा काही अभिनेत्रींनी त्याची घेतलेली फिरकी असो करणला त्या गोष्टीवरु नेहमीच वादाला सामोरं जावं लागलं आहे. याची त्याला जाणीव आहे. त्यामुळेच की काय करणनं आता आपण वैयक्तिक गोष्टींसाठी वेळ काढणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'

Web Title: Bollywood Producer Director Karan Johar Sad Feel About New Partner Life Change

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top