Riteish-Genelia: महाभारत अन् रामायणाची थट्टा नाय! जेनेलिया अन् रितेशवर पब्लिक का भडकली?

रितेश आणि जेनेलियाचा व्हिडिओ व्हायरल!
Riteish Deshmukh Genelia D'Souza
Riteish Deshmukh Genelia D'Souza Esakal

Riteish Deshmukh Genelia D'Souza: बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया हे नाव प्रसिद्ध आहे. रितेश आणि जेनेलिया ही जोडी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. चित्रपटांबरोबरच हे जोडपे सोशल मिडियावरही सक्रिय असतात. ते नेहमी त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर शेयर करतात जे व्हायरल होत असतात.

Riteish Deshmukh Genelia D'Souza
Shah Rukh Khan Dunki : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख शिर्डीत दाखल! साईबाबांच्या चरणी लीन

रितेश आणि जेनेलिया हे भन्नाट व्हिडिओ शेयर करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ इतके व्हायरल होतात की सेलिब्रेटी आणि चाहते देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया देतात.

त्यांचे हे फनी रिल्स चाहत्यांना खुपच आवडतात. मात्र आता त्यांनी एक रिल व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर केला. नेहमी सारखा व्हिडिओ शेयर करताच काही तासातच तो सोशल मिडियावर व्हायरलही झाला. मात्र हा व्हिडिओ नेटकऱ्यांना काहीसा पटला नाही. त्यामुळे चाहत्यांनी तो व्हिडिओ ताबडतोब डिलिट करण्याचा सल्ला दिला.

Riteish Deshmukh Genelia D'Souza
Pedro Henrique Death : स्टेजवर गात असतानाच पडला, 30 वर्षीय गायकानं घेतला अखेरचा श्वास!

त्याच झालं असं की बऱ्याच काळानंतर रितेश आणि जेनेलियाने त्यांच्या मिश्किल अंदाजात एक रील सोशल मिडियावर शेअर केली. या व्हिडिओमध्ये रितेश जेनेलियाला सांगतो की, राजा दशरथला तीन बायका होत्या, त्यामुळे मीही तीन लग्न करू शकतो, याला उत्तर देताना जेनेलियाने त्याला द्रौपदीची आठवण करुन दिली.

हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, ज्याला इंस्टाग्रामवर 6.4 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले. हा व्हिडिओ रितेश अन् जेनेलियाने केवळ हसवण्यासाठी केला मात्र काही नेटकऱ्यांना हा विनोद फारसा पटला नाही त्यांनी याला धर्माशी जोडले आणि दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. तुम्ही सनातन धर्माची खिल्ली उडवत आहात असं अनेकांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहिलं आहे.

Riteish Deshmukh Genelia D'Souza
Fighter song Sher Khul Gaye : 'शेर खुल गये पाहून होश उड गये'! ह्रतिकचा असा डान्स यापूर्वी पण पाहिलाय का?

यात एकानं लिहिलं आहे, 'तूम्ही राजा दशरथ' आणि 'द्रौपदी'ची खिल्ली उडवत आहात'. तर दुसऱ्याने लिहिले की, "तुम्ही उदाहरण दिले आहे, पण तुमच्यात राजा दशरथ आणि तुमची पत्नी द्रौपदीचे गुण आहेत का? अशा पवित्र नावांचा वापर मस्करी करण्यासाठी करू नका."

तर एकानं लिहिलं आहे, "सनातनवर विनोद करणे बंद करा, अन्यथा तुम्हीही बॉयकॉटचे नाव ऐकले असते" तर अनेकांनी हा व्हिडिओ डिलिट करावा असा सल्ला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com