Big Boss: साजिदवरुन राखी-शर्लिनमध्येच जुंपली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss
Sherlyn Chopra
Rakhi Sawant

Big Boss: साजिदवरुन राखी-शर्लिनमध्येच जुंपली...

साजिद खान बिग बॉसमध्ये दाखल झाला आणि अचानक शर्लिन चोप्रा प्रकाश झोतात आली.  तिने वांरवार साजिदला बिगबॉसमधुन काढण्याचीही मागणी केली. #metoo अंतर्गत झालेल्या  आरोपावरुन साजिद खान विरुद्ध तिचं म्हणणं नोंदवायला गेल्यावर मुंबई पोलीसात तिची तक्रार दाखल केली. त्यानंतर तिने बाहेर येत पत्रकारांशी संवाद साधला होता.

हेही वाचा: Rakhi Sawant: ‘तुला लाज कशी वाटत नाही’,राखी सावंतचे शर्लिन चोप्रावर गंभीर आरोप...

ड्रामा क्वीन राखी सावंतने शर्लिन चोप्रावरच गंभीर आरोप केले होते. तिने शर्लिन चोप्राची खिल्ली उडवली. एका व्हिडिओमध्ये राखी शर्लिनने साजिदवर केलेल्या आरोपांबद्दल बोलताना दिसत आहे. तिने शर्लिनची नक्कल करून तिची छेड काढली. इतकच नाही तर तिच्यावर गंभीर आरोपही केले होते. त्यात ‘आता 6 महिने थांबा, ती आणखी एक बलात्काराची केस आणेल. राखी पुढे म्हणाली की, आधी स्वतःला सुधारा आणि मग इतरांना सुधारा’ असं सल्लाही तिने शर्लिनला दिला होता. राखींने शर्लिनची पार लाजच काढलीय.

आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शर्लिन कुठे मागे राहणार होती. तिने राखीला चांगलच सुनावलं. राखीने जशी तिची नक्कल केली होती तशीच नक्कल करत ती म्हणाली, "हा काय मूर्खपणा आहे? जिममध्ये जा आणि जरा वेटलिफ्टिंग कर बॉडी बनंव." राखीची नक्कल करत तिने असेही सांगितले की, आदिलच्या आधी तिचे सर्व बॉयफ्रेंड आणि पती टाईमपास होते.

हेही वाचा: Big Boss16: सलमानच्या घराबाहेर आंदोलन; साजिद खानविरोधात शर्लिन आक्रमक

ती पुढे म्हणाली की राखीला मेहनत करायची नाहीये आणि तिला फक्त 24 तास मीडियासमोर राहायचे असते. तिने राखीला आव्हान दिले आणि म्हणाली, "तुझ्यात हिम्मत असेल तर माझ्यासमोर येऊन उभी रहा. राखी 31 किलोग्रॅम मेकअप करते आणि तिचे टक्कल लपवण्यासाठी विंगचा वापर करते आणि दोन तीन महिन्यात बॉयफ्रेंड बदलते,नवरे बदलते आम्ही काय बोललो का? तिला लाज वाटायला हवी’.

यावरही लगेचचं राखीनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात राखीचा एक व्हिडिओ समोर आलायं यात तिनं शर्लिनचं आव्हान स्वीकारत, ‘करारा जवाब मिलेगा’ असं प्रतिउत्तर दिलयं.त्यामूळे आता साजिद खान प्रकरण बाजुलाच राहिला असून राखी अन् शर्लिनमध्येच नवा वाद सुरु झालाय.या दोघींमध्ये चांगलीत जुपल्याचं दिसतयं असो मात्र यामूळे नेटकऱ्याचं चांगलच मनोरंजन होतांना दिसतयं. नेटकऱ्यांनी तर या भांडणाची तुलना चाळीतल्या पाण्यावरुन भांडणाऱ्या महिलांसोबतच केली आहे.