Shreyas Talpade Health Update
Shreyas Talpade Health Update esakal

Shreyas Talpade Health Update: हृदयविकाराच्या झटक्यानंतर आता श्रेयसची तब्येत कशी? अभिनेत्यानं स्वतः दिली माहिती

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती.

Shreyas Talpade Health Update: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या चाहत्यांना त्याची काळजी लागली होती.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली

श्रेयसला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार अशी माहिती समोर आली होती, मात्र अद्याप श्रेयसला डिस्चार्ज मिळालेला नाही. दरम्यान, श्रेयसने स्वत: त्याच्या तब्येतीचे अपडेट चाहत्यांना दिले आहे आणि चाहत्यांच्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभारही मानले आहेत.

एका वेबपोर्टलशी बोलताना श्रेयसने आपल्या तब्येतीबाबत हेल्थ अपडेट दिली यावेळी तो म्हणाला, 'तुमच्या सर्व समर्थन आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. मी आता थोडा बरा आहे.' पुढे, त्याने सांगितले की, तो अद्याप घरी पोहोचला नसून, अजूनही रुग्णालयात आहे.

आगामी 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या शूटिंगनंतर तो घरी परतला होता. शूटिंगनंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले, घरी परतताच श्रेयस तळपदेची प्रकृती अचानक बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. यानंतर त्याची पत्नी दीप्तीने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. तर बॉबी देओलने सांगितले होते की श्रेयसचे हृदय 10 मिनिटे थांबले होते.

श्रेयसच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो अक्षय कुमारच्या वेलकम टू जंगलमध्ये काम करणार आहे. हा सिनेमा 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com