esakal | बॉलीवूडला पुन्हा धक्का; अभिनेत्री दिव्या चोक्सीचे कर्करोगाने निधन...
sakal

बोलून बातमी शोधा

divya choksy

दिव्या चोक्साची जन्म भोपाळमध्ये झाला. ती अभिनेत्री तसेच गायिका आणि गीतकार होती. तिने आपले शालेय शिक्षण भोपाळमध्येच पूर्ण केले. त्यानंतर मास कम्युनिकेशनमधील ग्रॅज्युएशन करण्यासाठी ती नवी दिल्ली येथे गेली.

बॉलीवूडला पुन्हा धक्का; अभिनेत्री दिव्या चोक्सीचे कर्करोगाने निधन...

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : 'ये अपना दिल तो आवारा' या हिंदी चित्रपटासह टीव्ही मालिकेत काम करणारी अभिनेत्री दिव्या चोक्सीचे आज कर्करोगाने निधन झाले. ती 30 वर्षांची होती. दिव्याची मैत्रीण निहारिका रायजादाने सोशल मीडियावर ही माहिती दिली.  

लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेची दमदार कामगिरी; मुंबई विभागाने केली 'इतक्या' लाख वॅगन्सची मालवाहतूक...

दिव्या चोक्साची जन्म भोपाळमध्ये झाला. ती अभिनेत्री तसेच गायिका आणि गीतकार होती. तिने आपले शालेय शिक्षण भोपाळमध्येच पूर्ण केले. त्यानंतर मास कम्युनिकेशनमधील ग्रॅज्युएशन करण्यासाठी ती नवी दिल्ली येथे गेली. त्यानंतर डॉक्युमेंटरी व फिल्म मेकिंगमध्ये मास्टर्स करण्यासाठी युरोपला गेली. चित्रपटसृष्टीची आवड तिला होती. त्यामुळे लंडनहून ती थेट मुंबईत चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी आली. 

रुग्णवाहिकांकडून लुटमार सुरुच; अवघ्या अडीच किलोमीटरसाठी आकारले तब्बल 'इतके' हजार रुपये...

'एमटीव्ही मेकिंग द कट 2' आणि 'एमटीव्ही ट्रू लाइफ'चा ती एक भाग होती. एक अभिनेत्री आणि मॉडेल, दिव्या 2011 साली 'आय एएम एसएचई मिस युनिव्हर्स'मध्ये सहभागी झाली होती. आपल्या आजारपणाबद्दल दिव्याने सोशल मीडियावर माहिती दिली होती. तिला कर्करोगाचा आजार काही महिन्यांपूर्वी झाला होता. या रोगाशी ती सामना करीत होती. अखेर आज तिने या जगाचा निरोप घेतला आहे. 
---
संपादन : ऋषिराज तायडे