esakal | रुग्णवाहिकांकडून लुटमार सुरुच; अवघ्या अडीच किलोमीटरसाठी आकारले तब्बल 'इतके' हजार रुपये...
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करून ही माहिती दिली. कोरोनाबाधित रुग्णांसाठी जलदगतीने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेने केंद्रीकृत रुग्णवाहिका प्रणाली सुरू केली आहे. मात्र यानंतरही शहरातील खासगी रुग्णालये आणि रुग्णवाहिका सेवा यांची मनमानी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

रुग्णवाहिकांकडून लुटमार सुरुच; अवघ्या अडीच किलोमीटरसाठी आकारले तब्बल 'इतके' हजार रुपये...

sakal_logo
By
सुचिता करमरकर

कल्याण (वार्ताहर) : खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना येत असलेल्या अनुभवामुळे नागरिक त्रस्त असतानाच आता रुग्णवाहिका सेवाही जादा दराने आकारणी करत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. कल्याण पश्चिम येथील एका रुग्णाला डोंबिवलीतील खासगी रुग्णालयातून कोव्हिड स्पेशल आर. आर. रुग्णालयात दाखल करण्यासाठी 10 हजार रुपये आकारण्यात आल्याचे समोर आले आहे. 

इच्छाशक्तीचा विजय; अवघ्या दहा दिवसांत डोंबिवलीतील 91 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात...

संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करून ही माहिती दिली. कोरोनाबाधित रुग्णांसाठी जलदगतीने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेने केंद्रीकृत रुग्णवाहिका प्रणाली सुरू केली आहे. मात्र यानंतरही शहरातील खासगी रुग्णालये आणि रुग्णवाहिका सेवा यांची मनमानी सुरू असल्याचे स्पष्ट होत असल्याने यावर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

राज्यातील ठाकरे सरकारबाबत संजय राऊत यांचं मोठं भाष्य; म्हणाले हे काही...

कोरोनाबाधित रुग्णांसाठी पीपीई किट वापरावे लागत असल्याने अधिक पैसे द्यावे लागतील, असे चालकाने स्पष्ट केले. आपल्या नातेवाईकाच्या उपचारांचा प्राधान्याने विचार करून संबंधितांनी हे पैसे मान्य केले. मात्र याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरद्वारे माहिती देण्यात आली आहे.

आरे कॉलनीत लॉकडाऊनचा फज्जा, 33 जणांविरोधात गुन्हा

लूटमार थांबणार कधी?
कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळणे, रुग्णवाहिकेसाठी ज्यादा दराने पैसे आकारणे, अशा तक्रारी असल्याने महापालिकेने 3 जुलै रोजी केंद्रीकृत रुग्णवाहिका प्रणाली सुरू केली आहे. या अंतर्गत नागरिकांना रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र यानंतरही खासगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची लूट सुरूच असल्याने या मुजोरीला आळा बसणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top