esakal | अभिनेते मनोज वाजपेयीच्या वडिलांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेते मनोज वाजपेयीच्या वडिलांचे निधन

अभिनेते मनोज वाजपेयीच्या वडिलांचे निधन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीला (Manoj Bajpayee Father death) मोठा धक्का बसला आहे. त्याचे वडील आर के बाजपेयी यांचं नुकतचं निधन झालं आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आठवडाभरापूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्चही देण्यात आला होता. 83 वर्षीय आर के वाजपेयी यांच्यावर आज दिल्लीतील निगम बोध येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी मनोज यांचे सांत्वन केले आहे. त्यांच्या वडिलांना आदरांजलीही वाहिली आहे.

मनोज वाजपेयीच्या वडिलांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खूप गंभीर होती, ज्यामुळे मनोज वाजपेयी केरळमधील शूटिंग सोडून दिल्लीला रवाना झाले जेथे त्याच्या वडिलांवर उपचार सुरू होते. मनोज वाजपेयी केरळमध्ये आपल्या पुढील प्रोजेक्टचे शूटिंग करत होते, वडील रुग्णालयात असल्याची माहिती मिळताच ते केरळहून दिल्लीला रवाना झाले.मनोज वाजपेयीच्या वडिलांच्या निधनाची बातमी 'SHE' चे संचालक अविनाश दास यांनी ट्विटर वरून दिली.

अविनाश दास यांनी एका फोटोसह एक ट्विट केलं असून त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, मनोज भैय्याचे वडील आता नाहीत. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आता आठताहेत. मी हा फोटो भिती हरवा आश्रमात काढला होता. ते प्रचंड सहनशक्ती असलेलं व्यक्तीमत्त्व होतं. सुंदर विणकाम करणारे ते मोठे व्यक्ती होते. अभिवादन श्रद्धांजली. राधाकांत वाजपेयी यांच्या निधनाची माहिती मिळताच बॉलिवूड आणि अभिनेत्याचे मूळ गाव असलेल्या गौनाहा खंडाच्या बेलव्यात दु:खाचे सावट आहे. पश्चिम चंपारणमधील एका छोट्याशा खेडे गावातून मुंबईला पोहोचवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे.

हेही वाचा: Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट

हेही वाचा: आर्यनची NCB नं चौकशी केल्याचं कळताच, शाहरुखनं सोडलं पठाणचं शुटींग

loading image
go to top