esakal | बॉलीवूडकरांचा पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद..दिवे लावून फोटो केले शेअर
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood

पंतप्रधानांच्या आवाहनाला सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच उत्साहाने सहभाग दर्शवला..याचे फोटो आणि व्हिडिओ अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सोशल साईट्सवर शेअर केले आहेत..

बॉलीवूडकरांचा पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद..दिवे लावून फोटो केले शेअर

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना रविवार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील सर्व लाईट्स बंद करुन मेणबत्ती, दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं..पंतप्रधान यांचं हे आवाहन कोरोना व्हायरससाठी नागरिकांनी एकजुटीचं प्रदर्शन दर्शवण्यासाठी होतं..पंतप्रधानांच्या या आवाहनाला सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच उत्साहाने सहभाग दर्शवला..याचे फोटो आणि व्हिडिओ अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सोशल साईट्सवर शेअर केले आहेत..

हे ही वाचा: मिलिंद सोमण यांची ८१ वर्षीय आई घालतेय लंगडी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या आवाहनाला समर्थन देत त्यांचा दिवा लावतानाचा जुना फोटो पोस्ट केलाय..हा फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहिलंय,'नमस्कार, माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या आवाहनासाठी चला सगळे मिळून दिवे लावूया...' 

तर सुपस्टार रजनीकांत यांनी देखील पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत यात सहभाग दर्शवला..रजनीकांत यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन फोटो पोस्ट केलाय..या फोटोमध्ये त्यांनी हातात मेणबत्ती घेतल्याचं दिसून येतंय...

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने पंतप्रधानांच्या या आवाहनामध्ये सहभाग दर्शवला.विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे..या फोटोमध्ये अनुष्का आणि विराट घरामध्ये दिवे लावताना दिसून येत आहेत..

बॉलीवूडचं हॉट कपल जे नेहमी चर्चेत असतं त्या रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोणने देखील दिवे लावून यात सहभाग घेतला..रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे..या फोटोमध्ये दोघेही हातात दिवा घेऊन बाल्कनीत पाहायला मिळत आहेत..

अभिनेता कार्तिक आर्यनने देखील पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत दिवा लावला..कार्तिकने त्याचा फोटो पोस्ट करत म्हटलंय, 'एकत्र सगळं काही शक्य आहे..'

खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या बाल्कनीमध्ये मेणबत्ती हातात धरुन उभा असलेला पाहायला मिळाला..त्याने त्याचा हा फोटो पोस्ट करत म्हटलंय, 'आपण सगळे एकत्र आहोत, आणि या अंधःकारातून एकत्रच बाहेर पडू..तोपर्यंत निरोगी रहा आणि सुरक्षित रहा.'

अभिनेत्री क्रिती सॅनने देखील हातात मेणबत्ती घेऊन कोरोना व्हायरच्या विरुद्ध लढण्यासाठी समर्थन केलं आहे..हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिलंय, 'ही नेहमीच प्रार्थना करण्याची योग्य वेळ आहे, प्रेम, आरोग्य आणि आनंदासाठी..'

कोरोनाविरुध लढण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला..यात सामान्य नागरिकांसोबतंच बॉलीवूडकरांचा देखील चांगलाच सहभाग दिसून आला..

bollywood stars burn lamp and candles celebration against corona on pm modi appeal