Twinkle Khanna: ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर! अक्षय कुमारने पत्नीचे 'खास' शब्दात केले अभिनंदन

अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने लग्नानंतर फिल्मी जगताला अलविदा केला आहे. ट्विंकल खन्नाने अभिनय सोडून काही वर्षांपूर्वी लेखिका बनली होती.
Twinkle Khanna
Twinkle Khanna

Twinkle Khanna

अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने लग्नानंतर फिल्मी जगताला अलविदा केला आहे. ट्विंकल खन्नाने अभिनय सोडून काही वर्षांपूर्वी लेखिका बनली होती. त्यांनी आतापर्यंत चार पुस्तके लिहिली आहेत. दरम्यान ट्विंकल खन्नाने काही वर्षांपूर्वी सोडलेले शिक्षण पूर्ण केले.

ट्विंकल खन्नाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की तिने तिचा मुलगा आरवसह विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता अभिनेत्री ट्विंकल खन्नाने शिक्षण पूर्ण केले असून पदवीही मिळवली आहे. अभिनेता अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनानंतर ट्विंकल खन्नाने पुन्हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि लंडन विद्यापीठात फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला. आता ट्विंकलचा अभ्यास पूर्ण झाला असून तिला पदवीही मिळाली आहे. फोटो शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला सांगितले होते की तुला पुन्हा अभ्यास करायचा आहे. मला विश्वास बसला नव्हता.

Twinkle Khanna
दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेयर यंदा गुजरातला! बॉलीवूडचं काही खरं नाही...

अक्षयने पत्नीचे 'खास' शैलीत केले अभिनंदन

"दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला सांगितले होते की तुला पुन्हा अभ्यास करायचा आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटले की तु हे काय म्हणत आहे.  पण ज्या दिवशी मी तुला खूप मेहनत आणि घर, करिअर, मी आणि मुलांसह संपूर्ण विद्यार्थी जीवन उत्तम प्रकारे सांभाळताना पाहिले. तेव्हा मला कळाले की मी एका सुपर स्त्रीशी लग्न केले आहे. आज तुला पदवी मिळाली, टीना, मला तुझा किती अभिमान आहे हे सांगण्यासाठी पुरेसे शब्द जाणून घेण्यासाठी मला थोडा अधिक अभ्यास करावा लागले." (entertainment news in marathi)

Twinkle Khanna
Bollywood 2024 Movies : नवे वर्ष नवा धमाका! बॉलीवूडचे कोणते चित्रपट ठरणार बॉक्स ऑफिसचे किंग?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com