Pushpa 2:'पुष्पा- द रुल' मध्ये समंथाची जागा घेणार बॉलीवूडची हॉट अभिनेत्री

'Pushpa-The Rise' सिनेमातील समंथाच्या 'ऊ-अंटावा' गाण्यावरील नृत्यानं तिच्या फॅन-फॉलॉइंगमध्ये कमालीची वाढ झालीय.
Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth PrabhuGoogle
Updated on

दाक्षिणात्य सुपर स्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun) च्या 'पुष्पा-द राइज' सिनेमाचा फिव्हर अजुन लोकांमधून कमी झालेला नसताना आता पुष्पा च्या 'पार्ट २' ची चर्चा होऊ लागली आहे. 'पुष्पा-द राइज' सिनेमातील गाणी,संवाद सारंच एकदम लय भारी होतं. आणि म्हणूनच तो सिनेमा गाजला. या सिनेमातील गाण्यांवर,प्रसिद्ध संवादांवर अनेक व्हिडीओ रील्स आपण पाहिले असतील. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनीच त्या व्हिडीओ रील्सचा आनंद घेतला. अल्लू अर्जुनसोबतच लक्षात राहिली ती सिनेमात श्रीवल्ली साकारणारी रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) आणि 'ऊ अंटावा' गाण्यावर थिरकणारी समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu). समंथाच्या 'ऊ अंटावा' गाण्यावरील तडफदार नृत्यानं तर देशभरात अनेक तिचे चाहते नव्याने निर्माण केले. थोडक्यात तिच्या फॅन फॉलॉइंग मध्ये वाढ झाली. पण असं असतानाही 'पुष्पाच्या पार्ट २' मधून समंथाचा पत्ता कट करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

Samantha Ruth Prabhu
The Kashmir Files: सिनेमाचा क्लायमॅक्स शूट होताना ढसाढसा रडली अभिनेत्री

'पुष्पा द राइज' च्या दुसऱ्या भागाचं नाव असणार आहे 'पुष्पा द रुल'. या सिनेमात समंथाचा डान्स मात्र तिचे चाहते मिस करणार आहेत. समंथा ऐवजी आता 'पुष्पा- द रुल' मध्ये बॉलीवूडची सध्याची चर्चेतली अभिनेत्री असणार असल्याचं बोललं जात आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी 'पुष्पा २' मध्ये कलाकारांमध्ये थोडे बदल करण्याचा निर्णय घेतल्यामुळे समंथाऐवजी आता बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी(Disha Patani) सिनेमात दिसणार असल्याचं बोललं जात आहे. सुरुवातीला दिशानं सिनेमात आयटम सॉंग करण्यासाठी नकार दिल्याचं बोललं जात होतं. पण आता 'पुष्पा- द रुल' मध्ये दिशा एका धम्माल गाण्यावर थिरकताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Disha patani, Samantha Ruth Prabhu
Disha patani, Samantha Ruth PrabhuGoogle

'पुष्पा द रुल' सिनेमाची शूटिंग यावर्षी मार्च २०२२ किंवा एप्रिल २०२२ मध्ये सुरू होणार असल्याचं बोललं जात आहेत. सिनेमा १६ डिसेंबर २०२२ ला प्रदर्शित करणार असल्याचे संकेत सिनेमाच्या टीमनं दिले आहेत. लोकांमध्ये पुष्पाच्या पहिल्या भागासाठी असलेल्या क्रेझला पाहून आता दुसरा भाग त्यापेक्षा सुपरहिट करण्यासाठी सिनेमाची टीम मेहनत घेत असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com