बोमन इराणी यांच्या सासऱ्यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

boman irani

बोमन इराणी यांच्या सासऱ्यांचे निधन

मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांकडून दिलखुलास दाद मिळवणाऱ्या बोमन इराणी (Boman Irani) यांच्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्य़ा सासऱ्यांचे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या वर्षी जूनमध्ये बोमन यांच्या मातोश्रींचेही निधन झाले होते. त्यांचे वय ९४ वर्ष होते. बोमन इराणी यांनी सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट शेयर करुन त्याविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांच्या चाहत्यांनी यावेळी शोक व्यक्त करुन त्यांना कमेंटच्या माध्यमातून दिलासा दिला आहे.

यावेळी बोमन इराणी यांनी आपली पत्नी जेनोबिया यांच्यासाठी वडिलांच्या काही आठवणी शेयर केल्या आहेत. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, त्यांनी कधीही तक्रार केली नाही. ते एक ग्रेट व्यक्ती होते. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं. आपल्याला जे काही चांगल करता येईल ते ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात ते यशस्वीही झाले. त्यांच्याप्रती आपल्याला आदर होता. त्यांचे जाणे हे वेदनादायी आहे. त्यांच्यासारखा प्रामाणिक व्यक्ती मला दुसरा भेटला नाही. आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जीवनाचा पुरेपूर आनंद घेतला. ते भरभरून जगले. त्यांनी आपलं आयुष्य सेलिब्रेट केलं. असं सांगता येईल.

जेनोबियाचे (zenobia) पिता आणि अभिनेता परवेज हे माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत होते. आम्हाला त्यांची नेहमीच आठवण येत राहिल. यावेळी बोमन इराणी यांचा मुलगा आणि निर्माते कायोज इराणी यांनी देखील आपल्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानं त्यांचे काही फोटो शेयर केले आहेत. बोमन इराणी यांच्या या पोस्टवर बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली आहे. त्यात अभिनेता चंकी पांडे, तारा शर्मा सलूजा, विराफ पटेल यांचा समावेश आहे.

हेही वाचा: KBC : 'हवं तर माझा एक मुलगा घ्या, पण'...

हेही वाचा: 'सिद्धार्थ शुक्ला हार्ट अ‍ॅटकनं गेलाच नाही, खरं कारण कळू द्या'

Web Title: Boman Irani Father In Law Passed Away Share Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..