esakal | KBC : 'हवं तर माझा एक मुलगा घ्या, पण'...
sakal

बोलून बातमी शोधा

KBC : 'हवं तर माझा एक मुलगा घ्या, पण'...

KBC : 'हवं तर माझा एक मुलगा घ्या, पण'...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कौन बनेगा करोडपती kaun banega corepati हा शो त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे. दहा वर्षांहून अधिक काळ या शोनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्रात entertainment field सर्वाधिक प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेला शो म्हणून त्याचे नाव सांगता येईल. बॉलीवूडचे बिग बी शहेनशहा अमिताभ बच्चन amitabh bachchan हे या शो चं सुत्रसंचालन करताना दिसतात. त्यांनी आपल्या प्रभावी आवाजानं प्रेक्षकांना भारावून टाकलं आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी अमिताभ यांनी यापुढे आपण हा शो सोडणार असल्याचे सांगितलं होतं. त्याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही शेयर केली होती. मात्र ते पुन्हा या शो मध्ये आले आहेत. त्यांच्या एपिसोडला प्रेक्षकांची पसंतीही मिळताना दिसत आहे. सध्या त्या शो मध्ये वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी होताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात भारतीय क्रिकेट संघाचे दोन माजी खेळाडू या शो मध्ये सहभागी झाले होते. सौरव गांगुली saurav ganguli आणि विरेंद्र सेहवाग virender sehwagh यांच्याबरोबर अमिताभ यांनी सेटवर धमाल केली होती. त्या शो ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता केबीसीच्या मंचावर आले आहेत. प्रसिद्ध निर्माती आणि दिग्दर्शिका फराह खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण. या शो मध्ये सहभागी झाल्यानंतर फरहानं वेगवेगळ्या गंमतीजमती शेयर केल्या आहेत. या एपिसोडचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन हे त्या दोघींना केबीसीचे नियम समजावून सांगत आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ठराविक वेळ दिला आहे. त्यावर फराहनं बिग बी यांना केलेली विनंती ही सर्वांची लक्ष वेधून घेताना दिसते.

फराहनं सुरुवातीला बिग बी यांना आम्हाला प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ मिळावा अशी विनंती केली. ते जेव्हा खेळाला सुरुवात करतात तेव्हा त्यांची वेळ संपते. अशावेळी अमिताभ त्यांना म्हणतात, आपण कोणता तरी एक पर्याय लवकर सांगावा. त्यापूर्वी फराह अमिताभ यांना सांगतात की, तुम्ही मी एका चित्रपटासाठी साईन केलं आहे. आपण आता एका चित्रपटामध्य़े काम करणार आहोत. अमिताभही त्यांना गंमतीत तातडीनं उत्तर द्यायला सांगतात. तेव्हा फरहा त्यांना मी काय देऊ शकते असा प्रश्न करते. तुम्ही हवं तर माझा एक मुलगा घ्या, पण मला उत्तर देण्यासाठी वेळ द्या. अशा प्रकारची प्रतिक्रिया देते. त्यावर अमिताभ यांच्यासह उपस्थितांना हसू आवरत नाही.

हेही वाचा: 'सिद्धार्थ शुक्ला हार्ट अ‍ॅटकनं गेलाच नाही, खरं कारण कळू द्या'

हेही वाचा: टाइगरनं वार्दाला शिकवले मास्टरस्ट्रोक्स!

loading image
go to top