esakal | कंगनाला दिलासा नाहीच; जावेद अख्तरांनी केलेल्या खटल्याची कारवाई कायम- हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

kangana javed

कंगनाला दिलासा नाहीच; जावेद अख्तरांनी केलेल्या खटल्याची कारवाई कायम- हायकोर्ट

sakal_logo
By
सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा

अभिनेत्री कंगना रणौतच्या Kangana Ranaut विरोधात दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची कारवाई योग्य आहे असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यामुळे कंगनाला आता कारवाईला सामोरे जावे लागेल. कंगनाच्या विरोधात कवी आणि गीतकार जावेद अख्तर Javed Akhtar यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. यामध्ये न्यायालयाने खटल्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई रद्दबातल करण्यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात याचिका केली असून न्यायालयाने नियमबाह्य पध्दतीने कारवाई केली, असा आरोप याचिकेत केला आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली होती. न्या. डेरे यांनी यावर निकाल जाहीर केला. कंगनाला न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नसून याचिका नामंजूर केली.

अख्तर यांच्या वतीने एड जे भारद्वाज यांनी बाजू मांडली. दंडाधिकारी न्यायालयाने केलेली कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचे पालन करण्यात आले आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. तर, पोलिसांनी केलेल्या चौकशीवर ही कारवाई आहे, दंडाधिकारी न्यायालयाने स्वतंत्रपणे चौकशी केली नाही, असा बचाव कंगनाच्या वतीने एड रियाज सिद्दीकी यांनी केला होता.

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील बबिता-टप्पू एकमेकांना करतायत डेट

कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावर ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र हे आरोप तथ्यहीन आणि बोगस आहेत, असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे. न्यायालयाने जुहू पोलीस ठाण्याला यावर चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे की अख्तर यांच्या तक्रारीत तथ्य आहे. त्यामुळे न्यायालयाने कंगनाला फेब्रुवारीमध्ये समन्स बजावले होते. याप्रकरणी अंधेरी न्यायालयात १४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

loading image
go to top